Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > केस पातळ झाले-शेपूट दिसतं? 2 चमचे तेलात 'हा' पदार्थ घालून लावा; दाट-मजबूत होतील केस

केस पातळ झाले-शेपूट दिसतं? 2 चमचे तेलात 'हा' पदार्थ घालून लावा; दाट-मजबूत होतील केस

Hair Growth Home Remedy (Methi Dana For Hair Growth) : या तेलाचा वापर  आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता. २ ते ३ वेळा कोमट तेल स्काल्प  आणि केसांच्या मुळांना लावून व्यवस्थित मसाज करा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 14:40 IST2026-04-22T14:35:17+5:302026-04-22T14:40:35+5:30

Hair Growth Home Remedy (Methi Dana For Hair Growth) : या तेलाचा वापर  आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता. २ ते ३ वेळा कोमट तेल स्काल्प  आणि केसांच्या मुळांना लावून व्यवस्थित मसाज करा.

Hair Growth Home Remedy Can Soaked Fenugreek Seeds Increase Hair Growth | केस पातळ झाले-शेपूट दिसतं? 2 चमचे तेलात 'हा' पदार्थ घालून लावा; दाट-मजबूत होतील केस

केस पातळ झाले-शेपूट दिसतं? 2 चमचे तेलात 'हा' पदार्थ घालून लावा; दाट-मजबूत होतील केस

आजकाल कितीही नवनवीन फॅशन आल्यातरी लांब केसांची (Long Hairs) क्रेझ काही कमी होत नाही. लांबसडक, दाट केस मिळवण्यासाठी लोक काय काय करतात याची यादी खूपच मोठी आहे. काहीजण महागड्या उत्पादनांचा वापर करतात तर काहीजण हेअर ट्रिटमेंट्स घेतात त्याही खूपच खर्चिक असतात. पण तरीही काही खास फरक पडत नाही. (Hair Growth Home Remedy Can Soaked Fenugreek Seeds Increase Hair Growth)

केस का जास्त गळतात? (Why Hair Is Falling Too Mach)

केस गळणं ही सामान्य समस्या आहे आजकाल प्रदूषण, ताण-तणाव यामुळे केस गळणं, केस तुटणं, यांसारख्या समस्यांचे प्रमाण वाढल आहे. मार्केटमध्ये महागडे हेअर ऑईल्स, सिरम आणि ट्रिटमेंट्स आहेत पण याचा परिणाम जास्त दिसून येत नाही.आजही काही घरगुती उपाय जादूप्रमाणे काम करतात. अशाच एका घरगुती तेलाबद्दल समजून घेऊ.

तेलात मेथी मिसळून केसांना लावा (Apply Methi With hair Oil Is Good For Hairs)

मेथीचे  दाणे आयुर्वेदात बऱ्याच वर्षांपासून वापरले जात आहेत. मेथीमध्ये प्रोटीन, निकोटिनिक एसिड, लेसिथिन आणि अनेक प्रकारचे व्हिटामीन्स जसं की व्हिटामीन ए, बी आणि सी मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे नवीन केस उगवण्यात मदत होते. केस गळणं कमी होतं तसंच केसांची मुळं मजबूत आणि दाट होतात. नियमित वापरानं केस फक्त लांबच होत नाहीत तर दाट आणि चमकदारही होतात.

केसांसाठी जादूई हेअर ऑईल कसं बनवायचं? (How To make Homade Hair Oil)

लांब-दाट केसांसाठी हे हेअर ऑईल घरच्याघरी बनवणं खूपच सोपं आहे यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागार नाही. फक्त मेथीचे जाणे रात्रभर पाण्यात भिजवलेले राहू द्या. नंतर मंद आचेवर  ८ ते १० मिनिटं शिजवून घ्या. नंतर गाळून थंड होण्याची वाट पाहा. थंड झाल्यानंतर एका स्वच्छ काचेच्या बरणीत भरा मेथीचे हेअर ऑईल तयार आहे.

 हे केस कसे वापरावे? (How To apply Methi Hair Oil On Hairs)

या तेलाचा वापर  आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता. २ ते ३ वेळा कोमट तेल स्काल्प  आणि केसांच्या मुळांना लावून व्यवस्थित मसाज करा. कमीत कमी १ ते २ तास लावून ठेवा. नंतर माईल्ड शॅम्पूनं केस धुवा. सतत ४ ते ६ आठवडे हे तेल लावल्यानं केसांवर चांगला परिणाम दिसून येईल.

Web Title : बाल पतले हो रहे हैं? मेथी का तेल लगाएं, बाल घने होंगे।

Web Summary : बालों का झड़ना एक आम समस्या है, लेकिन घर का बना मेथी का तेल मदद कर सकता है। मेथी के बीज में विटामिन और प्रोटीन होते हैं जो बालों के विकास को बढ़ावा देते हैं और जड़ों को मजबूत करते हैं। सर्वोत्तम परिणामों के लिए इस तेल को सप्ताह में 2-3 बार लगाएं।

Web Title : Thinning hair? Use this fenugreek oil for thick, strong hair.

Web Summary : Hair fall is a common problem, but homemade fenugreek oil can help. Fenugreek seeds contain vitamins and proteins that promote hair growth and strengthen roots. Apply this oil 2-3 times a week for best results.