Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्याची त्वचा लूज पडली-सुरकुत्या आल्या? २ सोपे व्यायाम-बारीक रेषा येणार नाही, तरूण दिसाल

चेहऱ्याची त्वचा लूज पडली-सुरकुत्या आल्या? २ सोपे व्यायाम-बारीक रेषा येणार नाही, तरूण दिसाल

Effective Skin Tightening Face Yoga Exercise Wrinkles : त्वचा टाईट ठेवण्यासाठी त्वचेच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी काही फेशियल व्यायाम फायदेशीर ठरू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 12:31 PM2024-02-26T12:31:58+5:302024-02-26T13:06:59+5:30

Effective Skin Tightening Face Yoga Exercise Wrinkles : त्वचा टाईट ठेवण्यासाठी त्वचेच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी काही फेशियल व्यायाम फायदेशीर ठरू शकतात.

Effective Skin Tightening Face Yoga Exercise Wrinkles : How to Tighen Face Skin Exerise 2 Exercise | चेहऱ्याची त्वचा लूज पडली-सुरकुत्या आल्या? २ सोपे व्यायाम-बारीक रेषा येणार नाही, तरूण दिसाल

चेहऱ्याची त्वचा लूज पडली-सुरकुत्या आल्या? २ सोपे व्यायाम-बारीक रेषा येणार नाही, तरूण दिसाल

एका वयानंतर त्वचा लूज होऊ लागते. (Skin Care  Tips) चेहऱ्यावर  फाईन लाईन्स आणि सुरकुत्या दिसू लागतात. ज्यामुळे त्वचेच्या सौंदर्यावर परिणाम होतो.  त्वचेचा लूजनेस कमी करण्यासाठी लोक महागड्या  स्किन केअर प्रोडक्टस्चा वापर करतात. पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च करूनही हवातसा परिणाम दिसून येत नाही. (Effective Skin Tightening Face Yoga Exercise Wrinkles)

हे प्रोडक्ट्स  कितपत फायदेशीर ठरतील याचीही खात्री नसते. चेहऱ्यावर चांगला ग्लो येण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. फेस योगा तुमच्या त्वचेच्या मांसपेशींना बॅलेंन्स करण्यासाठी फायदेशीर ठरते. याबरोबरच त्वचा सॉफ्ट होण्यासह,स्ट्रेच होण्यासही मदत होते. कोणत्या प्रकारचा फेस योगा त्वचेसाठी फायदेशीर ठरतो ते पाहूया. (How to tighten Face Skin 2 Exercise)

आयुष्याच्या प्रत्येक परिक्षेत यशस्वी होतील मुलं; लहानपणापासूनच 'या' १० सवयी लावा-यशाचं सोपं सिकेट

त्वचा टाईट ठेवण्यासाठी त्वचेच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी काही फेशियल व्यायाम फायदेशीर ठरू शकतात. फेस योगा स्किन टाईट करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. फेस लिफ्टिंग योगा केल्याने चेहऱ्यांचे स्नायू टोन्ड होतात.

१) फिश एक्सरसाईज

ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी फिश व्यायाम हा उत्तम आहे. यासाठी गाल आतल्या बाजूने खेचा चेहरा माश्यासारखा बनवा. काही वेळासाठी डोळे उघडे ठेवा.  जेव्हा तुम्हाला वाटेल की, पापण्या मिटत आहोत तेव्हा पुन्हा शेपमध्ये आणा. हा व्यायाम केल्याने मसल्स आणि टिश्यूज चांगले राहण्यास मदत होईल. ज्यामुळे स्किन टाईट होईल आणि फाईन लाईन्स दूर होण्यासही मदत होईल.

२) स्माईल एक्सरसाईज

हा व्यायाम केल्याने ओठ  बाहेरच्या बाजूला काढा. त्यानंतर  तोंड पूर्ण उघडून बत्तीशी दाखवून हसा. ही प्रोसेस कमीत  कमी  १० वेळा करा. हा व्यायाम केल्याने गालांवर जमा झालेलं फॅट कमी होण्यास मदत होईल. याशिवाय जॉलाईन आणि गालांचे टोनिंग होण्यासही मदत होईल. 

३) माऊथ बलून एक्सरसाईज

खेळताना आपण अनेकदा फुगा फुगवतो. पण हा एक प्रकारचा व्यायाम आहे. ज्यामुळे चेहऱ्याला चांगला शेप येऊ शकतो. हा व्यायाम केल्याने गालांवरचे फॅट कमी होते आणि चिकबोन्स हायलाईट होतात.

पोटाची चरबी जास्त सुटलीये-वजन घटत नाही? सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पाणी प्या; स्लिम, मेंटेन राहाल

हा व्यायाम करण्यासाठी तोंडात हवा भरा आणि फुगा फुगवून घ्या त्यानंतर शक्य होईल तितकी हवा तोंडात भरा जेव्हा तोंडात हवा भराल तेव्हा कमीत कमी  ५ वेळा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. त्यानंतर  तोंडातील हवा बाहेर काढा. जवळपास १० ते १५ वेळा हा व्यायाम करा. घरी बसल्या बसल्या तुम्ही हा व्यायाम करू शकता.

Web Title: Effective Skin Tightening Face Yoga Exercise Wrinkles : How to Tighen Face Skin Exerise 2 Exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.