किचनमध्ये बारीक झुरळं फार झाली? घराच्या कोपऱ्यात ३ गोष्टी ठेवा, झुरळं होतील गायब

Published:June 13, 2024 03:46 PM2024-06-13T15:46:06+5:302024-06-13T18:47:11+5:30

How To Get Rid Of Cockroaches : झुरळं ज्या ज्या ठिकाणी दिसतात तिथे वेळीच उपाय केलेत तर गंभीर समस्या उद्भवणार नाहीत.

किचनमध्ये बारीक झुरळं फार झाली? घराच्या कोपऱ्यात ३ गोष्टी ठेवा, झुरळं होतील गायब

झुरळांमुळे घरात भरपूर आजार पसरतात. टॉयलेट, सिंक बाथरूमच्या खाली झुरळं आपला अड्डा बनवतात. अन्नाचे कण पडलेले असतील किंवा खरकटं अन्न असेल तर त्या ठिकाणी झुरळांचे साम्राज्य येते. भांडी किंवा खाण्यापिण्याच्या वस्तूंवर फिरत असतात. नकळतपणे पोटात गेल्यानं गंभीर आजार पसरू सकतात.

किचनमध्ये बारीक झुरळं फार झाली? घराच्या कोपऱ्यात ३ गोष्टी ठेवा, झुरळं होतील गायब

झुरळं ज्या ज्या ठिकाणी दिसतात तिथे वेळीच उपाय केलेत तर गंभीर समस्या उद्भवणार नाहीत. घरात झुरळं बघितल्यानंतर लहान मुलंसुद्धा घाबरतात. झुरळांपासून सुटका करण्यासाठी तुम्ही सोपे घरगुती उपाय करू शकता.

किचनमध्ये बारीक झुरळं फार झाली? घराच्या कोपऱ्यात ३ गोष्टी ठेवा, झुरळं होतील गायब

झुरळांपासून सुटका करण्यासाठी तुम्ही बेकींग सोड्याचा वापर करू शकता. बेकिंग सोडा झुरळ ज्या ठिकाणी असतात तिकडे शिंपडा. बेकिंग सोड्यात पाणी मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा त्यानंतर पाणी झुरळांवर शिंपडा.

किचनमध्ये बारीक झुरळं फार झाली? घराच्या कोपऱ्यात ३ गोष्टी ठेवा, झुरळं होतील गायब

घरात झुरळं दिसत असतील तर तुम्ही तेजपत्त्याचा वापर करू शकतात. तेजपत्त्याचा वापर केल्याने झुरळं मरणार नाहीत पण घराच्याबाहेर निघतील. याचा वापर करण्यासाठी तेजपत्ता पाण्यात घालून उकळवून घ्या. झुरळं असलेल्या ठिकाणी तमालपत्राची पावडर शिंपडा यामुळे झुरळं नष्ट होण्यास मदत होईल.

किचनमध्ये बारीक झुरळं फार झाली? घराच्या कोपऱ्यात ३ गोष्टी ठेवा, झुरळं होतील गायब

कडुलिंबाच तेल, कडुलिंबाची पानं किंवा कडुलिंबाची पावडर झुरळांवर वापरू शकता. कडुलिंबाच्या तेलात पाणी घालून स्प्रे बॉटलमध्ये भरा. झुरळं असलेल्या ठिकाणी घाला. कडुलिंबाची पानं वाटून याची पावडर बनवून झुरळांना पळवण्यासाठी तुम्ही वापरू शकता.

किचनमध्ये बारीक झुरळं फार झाली? घराच्या कोपऱ्यात ३ गोष्टी ठेवा, झुरळं होतील गायब

झुरळांना पळवून लावण्यासाठी तुम्ही पुदिन्याची पेस्ट पाण्यात मिसळून घरात शिंपडू शकता.

किचनमध्ये बारीक झुरळं फार झाली? घराच्या कोपऱ्यात ३ गोष्टी ठेवा, झुरळं होतील गायब

घरात अन्नाचे कण सांडणार नाही याची काळजी घ्या. घर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण घरातील अस्वच्छ भागांमध्ये झुरळांचा वावर जास्त होतो.