झगमगत्या दुनियेतील बापमाणूस ! आपल्या लेकरांसाठी प्रेमानं सगळी कामं करणारे पाहा सुपरस्टार बाबा...

Published:June 16, 2024 09:06 AM2024-06-16T09:06:04+5:302024-06-16T09:20:46+5:30

Father's Day Special : Bollywood Celebrity Father's Day : बॉलिवूड सुपरस्टार मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका निभावतात पण खऱ्या आयुष्यात वडिलांची भूमिका निभावण्यासाठी त्यांना नेमकं काय काय करावं लागत, ते पाहूयात...

झगमगत्या दुनियेतील बापमाणूस ! आपल्या लेकरांसाठी प्रेमानं सगळी कामं करणारे पाहा सुपरस्टार बाबा...

जून महिन्याचा तिसरा रविवार हा 'फादर्स डे' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने, बॉलिवूड सुपरस्टार मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका निभावतात पण खऱ्या आयुष्यात वडिलांची भूमिका निभावण्यासाठी त्यांना नेमकं काय काय करावं लागत, ते पाहूयात ( Father's Day Special : Bollywood Celebrity Father's Day).

झगमगत्या दुनियेतील बापमाणूस ! आपल्या लेकरांसाठी प्रेमानं सगळी कामं करणारे पाहा सुपरस्टार बाबा...

लेक राहाचं गोड हसू आपल्यासाठी जादुई असल्याचे रणबीर कपूर सांगतो. आलिया जेव्हा शूटिंगमध्ये व्यस्त असते तेव्हा बाप म्हणून लेक राहाची जबाबदारी रणबीरवर असते. रणबीरने त्याची आणि आलियाची मुलगी राहा कपूरच्या नावावरुन त्यांच्या नवीन बंगल्याचे नाव ठेवणार असल्याचं एका मुलाखती दरम्यान सांगितलं आहे. त्यामुळे मुंबईतल्या सगळ्यात महागड्या घराला नाव असणारी राहा ही पहिलीच स्टारकिड आहे.

झगमगत्या दुनियेतील बापमाणूस ! आपल्या लेकरांसाठी प्रेमानं सगळी कामं करणारे पाहा सुपरस्टार बाबा...

रितेश देशमुख व जिनिलिया डिसुझा यांची रिहान आणि राहील ही दोन्ही मुलं कायम चर्चेत असतात. रितेश व जिनिलिया आपल्या या दोन्ही मुलांचे फोटो व व्हिडीओ नेहमी इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. मिडियाचे कॅमेरे पाहताच रिहान आणि राहील ही दोन्ही मुलं हात जोडून नमस्कार करतात.त्यांचा हा अनोखा अंदाज नेटिझन्सना खूप भावतो. रितेश व जिनिलिया यांनी त्यांच्या मुलांना खूप चांगले संस्कार दिले आहेत.

झगमगत्या दुनियेतील बापमाणूस ! आपल्या लेकरांसाठी प्रेमानं सगळी कामं करणारे पाहा सुपरस्टार बाबा...

सारा ही बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी आहे. त्याचबरोबर करीना व सैफ यांना तैमूर व जेह अशी दोन मुलं आहेत. या दोन्ही मुलांची भांडण सोडवण्यातच सैफचा अधिक वेळ खर्ची होत असल्याची गोड तक्रार करीनाने केली आहे.

झगमगत्या दुनियेतील बापमाणूस ! आपल्या लेकरांसाठी प्रेमानं सगळी कामं करणारे पाहा सुपरस्टार बाबा...

कुणाल खेमू व सोहा अली खान यांची मुलगी, इनाया नौमी खेमू हिचा जन्म २०१७ मध्ये झाला. कुणाला खेमूने आपली मुलगी इनायाचे नाव आपल्या छातीवर टॅटूच्या रूपात लिहून घेतले आहे. इनाया इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय बालकांपैकी एक आहे.

झगमगत्या दुनियेतील बापमाणूस ! आपल्या लेकरांसाठी प्रेमानं सगळी कामं करणारे पाहा सुपरस्टार बाबा...

क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी हा नेहमी आपल्या पाचही मुलींसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. आफ्रिदीला अक्सा, अंशा, अज्वा, अस्मारा, आरवा अशा एकूण पाच मुली आहेत.

झगमगत्या दुनियेतील बापमाणूस ! आपल्या लेकरांसाठी प्रेमानं सगळी कामं करणारे पाहा सुपरस्टार बाबा...

शाहरुख खान जगभरातील लाखो लोकांच्या नजरेत सुपरस्टार म्हणून राज्य करत असताना, त्याची तीन मुले, आर्यन, सुहाना आणि अब्राहम हे त्याची थट्टा मस्करी करण्याचा एकही चान्स सोडत नसल्याचे खुद्द शाहरुख खान याने सांगितले आहे.

झगमगत्या दुनियेतील बापमाणूस ! आपल्या लेकरांसाठी प्रेमानं सगळी कामं करणारे पाहा सुपरस्टार बाबा...

अभिनेता इमरान हाश्मीचा मुलगा अयान हाश्मीला कॅन्सरचं निदान झालं होतं. हा काळ त्याच्यासाठी फारच कठीण असल्याचं तो सांगतो. या दरम्यान त्याला जे अनुभव आले त्यावर त्याने 'द किस ऑफ लाईफ' नावाचे पुस्तक लिहिले आहे.

झगमगत्या दुनियेतील बापमाणूस ! आपल्या लेकरांसाठी प्रेमानं सगळी कामं करणारे पाहा सुपरस्टार बाबा...

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना मुलगा आरव आणि मुलगी नितारा अशी दोन अपत्य आहेत. अक्षय आपल्या मुलांबद्दल सांगताना असे म्हणतो की, माझी मुलं मला दररोज घरी बघतात तिथे मी त्यांच्यासाठी अभिनेता नसून फक्त एक वडील असतो.