lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > आयुष्याच्या प्रत्येक परिक्षेत यशस्वी होतील मुलं; लहानपणापासूनच 'या' १० सवयी लावा-यशाचं सोपं सिकेट

आयुष्याच्या प्रत्येक परिक्षेत यशस्वी होतील मुलं; लहानपणापासूनच 'या' १० सवयी लावा-यशाचं सोपं सिकेट

10 ChildHood Habits To Achieve Guaranteed Success : बालपणात तुम्ही मुलांना कोणत्या वातावरणात वाढवत आहात हे फार महत्वाचे असते.  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 02:20 PM2024-02-25T14:20:35+5:302024-02-25T15:45:22+5:30

10 ChildHood Habits To Achieve Guaranteed Success : बालपणात तुम्ही मुलांना कोणत्या वातावरणात वाढवत आहात हे फार महत्वाचे असते.  

10 ChildHood Habits To Achieve Guaranteed Success : Childhood Habits To Achieve Success | आयुष्याच्या प्रत्येक परिक्षेत यशस्वी होतील मुलं; लहानपणापासूनच 'या' १० सवयी लावा-यशाचं सोपं सिकेट

आयुष्याच्या प्रत्येक परिक्षेत यशस्वी होतील मुलं; लहानपणापासूनच 'या' १० सवयी लावा-यशाचं सोपं सिकेट

आपल्या मुलांनी परिक्षेत यशस्वी व्हावं चांगलं नाव कमावावं असं प्रत्येक पालकाला वाटतं.  त्यासाठी काहीही करण्याची पालकांची तयारी असते. चांगले संस्कार देण्यापासून सुखसुविधा देण्यापर्यंत सगळी स्वप्न पूर्ण करण्याासाठी शक्त होईल ती मदत करतात. (How to be a Good Parent) बालपणात तुम्ही मुलांना कोणत्या वातावरणात वाढवत आहात हे फार महत्वाचे असते.  अशा कोणत्या सवयी आहेत ज्या लहानपणापासून मुलांना लावल्या तर मुलं मोठेपणी हूशार, यशस्वी होतील ते पाहूया. (10 ChildHood Habits To Achive Guaranteed Success)

१) वाचनाची सवय- बालपणापासूनच मुलांना चांगल्या गोष्टी वाचण्याची, पाहण्याची सवय असेल तर मुलं मोठेपणीही चांगल्या गोष्टींची अनुकरण करतील. त्यांना इंस्पिरेशनल, मोटिव्हेशलन गोष्टी वाचण्याचे प्रोत्साहन द्या.

फक्त १ भाजलेला लसूण खा; कोलेस्टेरॉल कंट्रोलसाठी रामदेव बाबांचा खास उपाय-नसा होतील स्वच्छ

२) जिज्ञासा- मुलं कोणतेही प्रश्न विचारत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्यातील जिज्ञासू वृत्ती जागृत ठेवा जेणेकरून ते जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतील.

३) टाईम मॅनेजमेंट- लहानपणापासूनच मुलांना वेळेचा सदूपयोग कसा करायचा ते समजावून  सांगा.  अभ्यासाची, खेळण्याची वेळ ठरवून द्या. मुलांचा जास्तीत जास्त वेळ प्रोडक्टिव्ह होईल याकडे लहानपणापासूनच लक्ष असू द्या.

४) हेल्दी हॅबिट्स-  चांगलं खाण्याची, व्यायाम करण्याची सवय असेल तर मुलांची ओव्हरऑल हेल्थही चांगली राहील आणि मुलांना अभ्यास करण्याचा उत्साह राहील.

५) क्रिएटिव्हटी- इमॅजिनेशन आणि इनोव्हेटिव्ह थिंकींगमुळे मुलांना यश मिळण्यास मदत होते. सुरूवातीपासूनच त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळ्या गोष्टी करण्याची सवय लावा. यामुळे मुलांना कसलीही कमतरता भासणार नाही.

प्रत्येक परिक्षेत टॉप करतील मुलं; ५ गोष्टी करा, न ओरडता, न रागवता अभ्यासात हूशार होतील

६) कम्यूनिकेशन स्किल- बरीच मुलं हूशार, प्रतिभावान असतात पण त्यांना व्यवस्थित बोलताच येत नाही आपले विचार मांडता येत नाही, अशी मुलं प्रश्नही विचारत  नाहीत.  चांगल्या कम्युनिकेशनमुळे नातेसंबंध चांगले राहतात आणि रिलेशनशिपही चांगले राहण्यास मदत होते.

७) गोल  सेटिंग- मुलं जे काही ठरवतात ते त्यांना पूर्ण करायला शिकवा. कारण लहानपणापासूनच ही सवय लागली तर मोठेपणी मुलं दिलेला टास्क पूर्ण करतील.

८) उंची वाढण्यासाठी-  मुलांची उंची वाढवण्यासाठी लहानपणीच त्यांना व्यायाम करण्याची, सायकल चालवण्याची आणि हेल्दी अन्नपदार्थ खाण्याची सवय लावा. 

९) मान-सन्मान- मुलांना मोठ्यांसोबतच लहानांचाही आदर करायला शिकवा. या सवयीमुळे मुलं कधीच कोणाशीही उद्धटपणे वागणार नाहीत. नेहमी नम्रतेने वागतील.

१०) स्वत:ची काम स्वत: करणं- या सवयीमुळे तुमची मुलं कोणावरही अवलंबून राहणार नाहीत. मुलांना शिस्त लागेल आणि इतरांशी आदराने वागतील. 

Web Title: 10 ChildHood Habits To Achieve Guaranteed Success : Childhood Habits To Achieve Success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.