We don't want the goons, want MP, Uddhav Thackeray criticism on Narayan Rane | आम्हाला गुंड नको, खासदार हवेत, उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला
आम्हाला गुंड नको, खासदार हवेत, उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला

रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली असताना राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपात कुठेही कमी पडताना दिसत नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. या आधी इथे गुंड होते , विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढलीत. आम्हाला गुंड नकोत खासदार हवे आहेत असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंना टोला लगावला. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रत्नागिरी येथे जाहीर सभा घेतली. खासदारांचे शिक्षण काढता. शिक्षण काय संतानी घेतले होते का ? बहिणाबाई न शिकता त्यांनी मोठी उंची गाठली. विनायक राऊत यांनी कधीही हातातला झेंडा बदलला नाही. निष्ठा हवी असते. समोरच्या उमेदवाराकडून तुम्ही काय निष्ठेची अपेक्षा ठेवता अशी टीका उद्धव यांनी नारायण राणे यांच्यावर केली. या मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे निवडणूक लढवत आहेत.  

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी महाराष्ट्रभर फिरतोय. नेते मंडळींनी भाषणात आपण काय करतोय हे मतदारांना सांगितले पाहिजे. एका कुटुंबात वेगवेगळे झेंडे लोक घेत आहेत. तसे इथे होऊन चालायचे नाही. काही लोकांच्या सभेला गर्दी असते. आमच्या सभेला जी गर्दी असते ती मनाने आलेली लोक असतात असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीलाही टीकेचं लक्ष्य केलं. कस खायचं हे यांच्या समोरच्याकडून शिकावे. a टू z  इतके घोटाळे आहेत. राहुल गांधी हे 124 A  हा देशद्रोहाचे कलम काढणार असे त्यांच्या जाहीरनाम्यात आहे. तुम्हाला देशद्रोह्यांना फासावर लटकवणारे सरकार पाहिजे की पाठीशी घालणार सरकार पाहिजे अशी टीका उद्धव यांनी काँग्रेसवर केली. तर शरद पवार बोलतात की गांधी घराण्याचा आदर केला पाहिजे. आम्ही त्या काँग्रेसला मानतो ज्यांनी स्वातंत्र्यसाठी लढा दिला. आम्ही त्या काँग्रेसला मानतो ज्यांनी स्वातंत्र्यसाठी लढा दिला. त्यांना पाहून मान आदरानं वर येते आणि आता मान शरमेने खाली जाते. नेहरू, महात्मा गांधी अनेक क्रांतिकारकांनी जर हाल भोगले नसते तर राहुल गांधी पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहू शकले असते का ? असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. 

तसेच आम्ही युती केली ती युती शेतकऱ्यांसाठी देश हितासाठी केली. शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आणि कर्जमाफी यासाठी युती केली. देव देश आणी धर्म साठी केली युती असा विश्वास व्यक्त करत धनुष्यबाणाला आणि कमळाला मत म्हणजे तुमचे स्वतःचे स्वतःला मत. आपल्या कुटुंबासाठी असलेल मत आहे असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरेंनी लोकांसमोर केलं.  
 


Web Title: We don't want the goons, want MP, Uddhav Thackeray criticism on Narayan Rane
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.