Ratnagiri: गणपतीपुळेत भाद्रपदी गणेशोत्सव सुरू; श्रीच्या मंदिरात आज सहस्त्र मोदक समर्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:35 IST2025-08-25T19:34:12+5:302025-08-25T19:35:27+5:30
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे स्वयंभू श्री मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सव सुरू असून, सोमवार २५ ऑगस्ट रोजी ...

Ratnagiri: गणपतीपुळेत भाद्रपदी गणेशोत्सव सुरू; श्रीच्या मंदिरात आज सहस्त्र मोदक समर्पण
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे स्वयंभू श्री मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सव सुरू असून, सोमवार २५ ऑगस्ट रोजी सहस्त्र मोदक समर्पण करण्यात आले.
विश्वस्त विनायक तुकाराम राऊत यांनी सपत्नीक मनोभावे पूजा आणि सहस्रनाम समर्पण करत सहस्र मोदक श्रींना समर्पण केले.
यावेळी संस्थानचे मुख्य पुजारी प्रभाकर घनवटकर, नीलेश घनवटकर, अमित घनवटकर, चैतन्य घनवटकर तसेच विश्वस्त विद्याधर शेंडे आणि अनेक भक्तगण उपस्थित होते.
महापूजेद्वारे प्रारंभ
स्वयंभू श्री गणरायाच्या मुख्य मंदिरामध्ये काल, रविवारपासून भाद्रपद गणेशोत्सवाला महापूजेद्वारे प्रारंभ करण्यात आला. संस्थान श्रीदेव गणपतीपुळेतर्फे पंच नीलेश कोल्हटकर यांनी सपत्नीक ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारांच्या जयघोषात महापूजा केली. ‘श्रीं’चे मंदिर पानाफुलांनी तसेच विद्युत रोषणाईने सजवण्यात आले हाेते. रविवार, २४ ते २८ ऑगस्ट २०२५ हे पाच दिवस उत्सव चालणार आहे.
यावेळी मंदिराचे मुख्य पुजारी प्रभाकर घनवटकर, अमित घनवटकर, नीलेश घनवटकर तसेच इतर सर्व ब्रह्मवृंद आणि अध्यक्ष श्रीराम केळकर, पंच विनायक राऊत, पंच सचिव विद्याधर शेंडे, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे कर्मचारी, ग्रामस्थ व पर्यटक उपस्थित होते. या भाद्रपदी गणेशोत्सवासाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंच कमिटी मंदिराचे मुख्य पुजारी व ब्रह्मवृंद संस्थान श्रीदेव गणपतीपुळेचे कर्मचारी मेहनत घेत आहेत.