राजन साळवींनी आमदार नव्हे तर ‘भाऊ’ म्हणून नाते निर्माण केले : भास्कर जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 17:48 IST2024-10-29T17:46:52+5:302024-10-29T17:48:35+5:30

विनोद पवार राजापूर : राजापूर विधानसभा मतदारसंघात गेली २० वर्षे आमदार म्हणून नव्हे तर तुमचा भाऊ म्हणून  राजन साळवी ...

Rajan Salvi created relationship as 'brother' not as MLA: Bhaskar Jadhav | राजन साळवींनी आमदार नव्हे तर ‘भाऊ’ म्हणून नाते निर्माण केले : भास्कर जाधव

राजन साळवींनी आमदार नव्हे तर ‘भाऊ’ म्हणून नाते निर्माण केले : भास्कर जाधव

विनोद पवार

राजापूर : राजापूर विधानसभा मतदारसंघात गेली २० वर्षे आमदार म्हणून नव्हे तर तुमचा भाऊ म्हणून  राजन साळवी यांनी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगत या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सुमारे १८० ते २०० जागा मिळतील, असा आशावाद उद्धवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांनी राजापुरात पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

राजापूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राजापूरचे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्या प्रचारार्थ राजापूर शहरातील मातोश्री सभागृहात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यानंतर भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला.

राज्यात महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना त्यातील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याबाबत विचारले असता भास्कर जाधव म्हणाले की, अविनाश लाड हे आपले चांगले मित्र आहेत. ते निश्चितच निवडणुकीतून माघार घेतील आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

भास्कर जाधव पुढे म्हणाले की, मागील २० वर्षे राजन साळवी यांनी आमदार म्हणून नाही तर तुमचा हक्काचा भाऊ म्हणून सेवा केली आहे. विश्वासाचे नाते त्यांनी निर्माण केले आहे. त्यामुळे राजन साळवी यांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला

Web Title: Rajan Salvi created relationship as 'brother' not as MLA: Bhaskar Jadhav