निवडणूक आल्यावर मनसेची सेटींग सुरू; खासदार विनायक राऊत यांचा आरोप
By मनोज मुळ्ये | Updated: March 20, 2024 15:47 IST2024-03-20T15:46:38+5:302024-03-20T15:47:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोणतीही निवडणूक आली की मनसेचे कोणा ना कोणासोबत सेटींग सुरू होते. तसे ते आता ...

निवडणूक आल्यावर मनसेची सेटींग सुरू; खासदार विनायक राऊत यांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोणतीही निवडणूक आली की मनसेचे कोणा ना कोणासोबत सेटींग सुरू होते. तसे ते आता भाजपकडे गेले आहेत. पण या निवडणुकीत त्यांचे पानिपत होईल, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, खासदार विनायक राऊत यांनी केली.
रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मनसेसह भाजपवरही टीका केली. खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती यावर आपला सदस्य निवडून यावा, अशी मनसे प्रमुखांची मानसिकता आतापर्यंत कधीही दिसलेली नाही. निवडणूक आली की ते कोणा ना कोणासोबत सेटींग करतात. केवळ उद्धव ठाकरे यांचा द्वेष करुन त्यांना टक्कर देण्यासाठीच ते भाजपसोबत गेले आहेत. पण लोक त्यांना ओळखून आहेत आणि या निवडणुकीत त्यांचे पानिपत होईल, असे राऊत यांनी सांगितले.
भाजपला आता कसलीच गॅरेंटी वाटत नसल्याने ते इकडच्या तिकडच्या लोकांना गोळा करुन आपली पाेळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडीमधील जागा वाटप अंतिम होत आले आहे. केवळ एकदोन जागांबाबतच चर्चा सुरू आहे. बाकी जागा निश्चित झाल्या आहेत. त्यात कोणतीही अडचण नाही, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.