हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित निवडणुकीला सामोरे जाऊया : रवींद्र चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 18:23 IST2024-04-14T18:22:36+5:302024-04-14T18:23:02+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क अडरे (चिपळूण) : लोकसभा निवडणुकीत असणाऱ्या मतदाराला आम्ही सर्व एकच आहोत, असा विश्वास द्या. आपापसातील हेवेदावे ...

हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित निवडणुकीला सामोरे जाऊया : रवींद्र चव्हाण
लाेकमत न्यूज नेटवर्क
अडरे (चिपळूण) : लोकसभा निवडणुकीत असणाऱ्या मतदाराला आम्ही सर्व एकच आहोत, असा विश्वास द्या. आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरे जाऊया, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिपळूण येथील महायुतीच्या मेळाव्यात केले.
रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, ही निवडणूक देशासाठी महत्त्वाची असून, देशाचे सक्षमपणे नेतृत्व कोण करू शकतो? हे मतदारांना समजावून सांगा. कोणी भावनिक आवाहन करतील. मात्र, आपण सर्वांनी मोदींविषयी मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा, असे सांगितले.
आमदार शेखर निकम म्हणाले की, राज्यघटना बदलण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून होत आहे. मात्र, गेली दहा वर्षे एकहाती सत्ता असतानाही हा प्रयत्न झाला नाही आणि तसा कोणी प्रयत्नही करणार नाही. यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला कोणी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार मधुकर चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा चव्हाण आदी उपस्थित होते.