दापोलीत वृध्द महिलेचा खून, गळ्यातील माळ चाेरीला

By अरुण आडिवरेकर | Updated: July 18, 2023 14:04 IST2023-07-18T14:03:42+5:302023-07-18T14:04:10+5:30

वृद्धेच्या खुनाच्या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली

Elderly woman killed in Dapoli, her gold mal stolen | दापोलीत वृध्द महिलेचा खून, गळ्यातील माळ चाेरीला

दापोलीत वृध्द महिलेचा खून, गळ्यातील माळ चाेरीला

दापाेली : झाेपेत वृद्ध महिलेचा खून करुन तिच्या अंगावरील साेन्याची माळ चाेरुन नेल्याची घटना विसापूर - मधलीवाडी (ता. दापाेली) येथे घडली आहे. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दीपावती सीताराम घाग (८७) असे वृद्धेचे नाव असून, हा प्रकार साेमवारी सकाळी उघडकीला आला. दागिन्यासाठीच हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकाराबाबत या महिलेच्या मुलाने फिर्याद दिली आहे. दीपावती घाग या वयाेवृद्ध आणि आजारी हाेत्या. त्या विसापूर येथील मधलीवाडीतील विश्रांतीनगर येथे एकट्याच राहत हाेत्या. हा खून रविवारी (१६ जुलै) ते साेमवारी (१७ जुलै) सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान हा खून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दीपावती घाग या रविवारी रात्री घरामध्ये झोपल्या हाेत्या. त्यांच्या वयोवृद्ध व आजारपणाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. त्याने वृद्धेच्या छातीवर जोराचा प्रहार करून त्यांचा खून केला. त्यानंतर त्याने महिलेच्या गळ्यातील ७८ हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चाेरून नेल्याचे समाेर आले आहे.

वृद्धेच्या खुनाच्या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, याबाबत दापाेली पाेलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी या घटनेचा पंचनामा करुन मारेकऱ्याचा शाेध घेण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Elderly woman killed in Dapoli, her gold mal stolen