Crime News: प्रेमास नकार दिल्याने मुलीची सोशल मीडियावरुन केली बदनामी; तरुणास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 17:02 IST2022-06-17T17:00:00+5:302022-06-17T17:02:20+5:30

प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यासाठी नकार दिल्याने साेशल मीडियावर मुलीचा फोटो टाकून अश्लील मजकूर पोस्ट केला

Denial of love defames girl on social media; The youth was arrested in dapoli | Crime News: प्रेमास नकार दिल्याने मुलीची सोशल मीडियावरुन केली बदनामी; तरुणास अटक

Crime News: प्रेमास नकार दिल्याने मुलीची सोशल मीडियावरुन केली बदनामी; तरुणास अटक

दापोली : शहरातील एका अल्पवयीन मुलीने प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणाने साेशल मीडियावर मुलीची बदनामी केल्याचा प्रकार घडला आहे. मुलीसंदर्भात अश्लील मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी तरुणाविराेधात गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

अनिकेत रवींद्र ढेपे-पाटील (२४) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने शहरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यासाठी सांगितले. मात्र, या मुलीने त्याला नकार दिल्याने अनिकेतने साेशल मीडियावर या मुलीचा फोटो टाकून अश्लील मजकूर पोस्ट केला. त्यामुळे बदनामी झालेल्या या मुलीने दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

दापोली पोलीस स्थानकात अनिकेतविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलीस निरीक्षक विवेक आहिरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Denial of love defames girl on social media; The youth was arrested in dapoli