अनंत गीतेच पुन्हा विजयी होणार- प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 01:39 IST2019-04-18T01:39:07+5:302019-04-18T01:39:40+5:30

अनंत गीते यांना विजयी करण्यासाठी भाजप अहोरात्र मेहनत घेत असून, अनंत गीते पुन्हा विजयी होऊन मंत्री म्हणून दिल्लीत जातील, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी महाडमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Pravin Darekar will be victorious again | अनंत गीतेच पुन्हा विजयी होणार- प्रवीण दरेकर

अनंत गीतेच पुन्हा विजयी होणार- प्रवीण दरेकर

दासगाव : रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते यांना विजयी करण्यासाठी भाजप अहोरात्र मेहनत घेत असून, अनंत गीते पुन्हा विजयी होऊन मंत्री म्हणून दिल्लीत जातील, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी महाडमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आमदार प्रवीण दरेकर हे गेले दोन दिवस महाड आणि पोलादपूरमध्ये अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. भाजप-सेना-आरपीआय युतीचे उमेदवार अनंत गीते हे स्वच्छ चारित्र्याचे आणि भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले उमेदवार आहेत. अनंत गीते हे किमान दोन लाखांच्या फरकाने पुन्हा विजयी होतील, असा ठाम विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला. अनंत गीते हे कायम प्रसिद्धीपासून दूर राहिले असले तरी त्यांची विकासकामे मोठी आहेत. या विकासकामांवरच मतदारांचा विश्वास आहे. भारतात नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी सक्षम यंत्रणा उभी केली आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
सध्या राज ठाकरे यांनी, मोदी आणि शहामुक्त भारत असा प्रचार सुरू केला आहे, याबाबत बोलताना प्रवीण दरेकर यांनी, राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाचा एकही उमेदवार उभा न करता दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी सभा घेणे हे कार्यकर्त्यांना पटलेले नाही, असेदेखील दरेकर यांनी सांगितले.

Web Title: Pravin Darekar will be victorious again