रायगडात मतदानाला गेलेल्या मतदाराचा मृत्यू; चक्कर येऊन खाली कोसळले होते
By राजेश भोस्तेकर | Updated: May 7, 2024 10:40 IST2024-05-07T10:40:05+5:302024-05-07T10:40:40+5:30
महाड मधील घटना, प्रकाश याचा नक्की मृत्यू कशाने झाला याबाबत माहिती कळलेली नाही आहे.

रायगडात मतदानाला गेलेल्या मतदाराचा मृत्यू; चक्कर येऊन खाली कोसळले होते
अलिबाग - रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. महाड विधानसभा मतदार संघातील प्रकाश चीनकुटे हे मतदार दाबेकर कोडं चीजळोली येथील मतदान केंद्रावर मतदान साठी गेले होते. यावेळी त्यांना चक्कर आल्याने ते माघारी फिरले होते. मात्र मतदान केंद्राबाहेर आल्यानंतर त्यांना चक्कर येऊन त्याचा मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील तापमान हे ३२ अंश एवढे आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या वातावरण तापलेले आहे. प्रकाश याचा नक्की मृत्यू कशाने झाला याबाबत माहिती कळलेली नाही आहे.