Kokan Flood : मुख्यमंत्र्यांसमोर महाडवासीयांनी टाहो फोडला, माय-बाप सरकारने धीर दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 05:35 PM2021-07-24T17:35:57+5:302021-07-24T17:38:09+5:30

Kokan Flood : निसर्ग कोपात आक्रीत घडलं, हे पाहिल्यानंतर, डोंगरदऱ्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल. वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण त्याचं प्रमाण आणि परिणाम कुणालाही सांगता येत नाही.

Kokan Flood : In front of the Chief Minister uddhav thackeray, the people of Mahad cryign and emotional , the parents gave patience | Kokan Flood : मुख्यमंत्र्यांसमोर महाडवासीयांनी टाहो फोडला, माय-बाप सरकारने धीर दिला

Kokan Flood : मुख्यमंत्र्यांसमोर महाडवासीयांनी टाहो फोडला, माय-बाप सरकारने धीर दिला

Next
ठळक मुद्देमहाडमधील दुर्घटनेत जवळपास 50 जणांनी आपली जीव गमावलाय. कुणी आई गमावलीय, कुणी आपलं लहान लेकरू गमावलंय. कुणाचं अख्ख कुटुंबच या निसर्गकोपात जमीनदोस्त झालंय.

रायगड - मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात ४० हून अधिक ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. या गावात अद्यापही बचावकार्य सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर तळीये गावाला मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी भेट दिली. त्यावेळी, घडलेल्या दुर्घटना पाहता सरकारकडून पुनर्वसन आराखडा आणि जल मॅनेजमेंट करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच पीडित कुटुंबीयांची भेट घेत धीर दिला. यावेळी, अनेकांनी राज्याच्या प्रमुखांसमोर टाहो फोडला. 

निसर्ग कोपात आक्रीत घडलं, हे पाहिल्यानंतर, डोंगरदऱ्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल. वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण त्याचं प्रमाण आणि परिणाम कुणालाही सांगता येत नाही. कालपासून सातारा, सांगली, कोल्हापूर भागात खूप तणाव होता. नद्यांचं पाणी शहरात शिरलं आहे, ते पाहता नद्यांच्या वाहत्या पाण्यासाठी वॉटर मॅनेजमेंटचाही आराखडा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल झाले. तेथील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला. तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले. मात्र, यावेळी मायबाप सरकारपुढं अनेकांनी टाहो फोडला. 

महाडमधील दुर्घटनेत जवळपास 50 जणांनी आपली जीव गमावलाय. कुणी आई गमावलीय, कुणी आपलं लहान लेकरू गमावलंय. कुणाचं अख्ख कुटुंबच या निसर्गकोपात जमीनदोस्त झालंय. पावसाच्या पाण्यातही कोकणवासीयांचे अश्रू लपून राहत नाही. कोकणचा पूर जेवढा भयानक, तेवढाच डोळ्यातील अश्रूंचा पूर हा विध्वसंक वाटत आहे. मात्र, निसर्ग कोपापुढे माणूस हतबल असतो. मग, तो राज्याचा प्रमुख असला तरीही. दरम्यान, दरड कोसळलेल्या ठिकाणी ते पाहणी करत असून त्यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हेदेखील उपस्थित आहेत.

आपत्ती व्यवस्थापन करणारेही माणसंच

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वच ठिकाणी आपली पथकं पोहोचत आहेत. अनेक ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर केलं आहे, अद्यापही जिथं गरज आहे, तेथील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन पुरेशा प्रमाणात आणि तातडीने येत नाहीत, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना हे आरोप योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आपत्ती व्यवस्थापन करणारीही माणसंच आहेत, रस्ते खचलेत, पूर येतोय तेथे घटनास्थळी पोहोचायला त्यांनाही वेळ लागत आहे. पावसाची, वाहत्या पाण्याची अडचण आहे. मात्र, या टीम त्यांचं काम जोमानं करत आहेत, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 
 

Web Title: Kokan Flood : In front of the Chief Minister uddhav thackeray, the people of Mahad cryign and emotional , the parents gave patience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.