आम्हालाही निवडून आणण्याची गॅरंटी घ्यावी; भरत गोगावलेंनी जाहीर सभेत व्यक्त केली खंत

By राजेश भोस्तेकर | Published: April 18, 2024 03:43 PM2024-04-18T15:43:57+5:302024-04-18T15:44:41+5:30

रायगड लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघात जो अधिक लीड तटकरे ना मिळून देईल त्यांना जास्त निधी द्या असेही आमदार गोगावले यांनी म्हटले आहे.

Admit to get us elected in assembly elections too! MLA Bharat Gogawle expressed his regret in a public meeting | आम्हालाही निवडून आणण्याची गॅरंटी घ्यावी; भरत गोगावलेंनी जाहीर सभेत व्यक्त केली खंत

आम्हालाही निवडून आणण्याची गॅरंटी घ्यावी; भरत गोगावलेंनी जाहीर सभेत व्यक्त केली खंत

अलिबाग : पहिल्यांदाच शिवसैनिकाला रायगड लोकसभा मतदार संघात घड्याळ चिन्हावर बटन दाबून मतदान करायचे आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सुनील तटकरे यांना मतदान करायचे आहे. मोदींची विकासाची गॅरंटी आहे. तशीच सुनील तटकरे यांना प्रचंड फरकाने निवडून आणण्याची गॅरंटी आम्ही घेऊ. पण तटकरे निवडून आल्यानंतर त्यांनी विधानसभेला निवडून आणण्याची गॅरंटी घ्यावी अशी खंत शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांनी जाहीर सभेत बोलून दाखवली आहे. तसेच रायगड लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघात जो अधिक लीड तटकरे ना मिळून देईल त्यांना जास्त निधी द्या असेही आमदार गोगावले यांनी म्हटले आहे. भरत गोगावले यांनी बोलल्याप्रमाणे मी ही गॅरंटी देतो अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे.

महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा गुरुवारी १८ एप्रिल रोजी अलिबाग येथे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी डी के टी शाळे समोरील पटांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना शिंदे सेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. यावेळी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडून देण्याचे आवाहन करीत विधानसभा निवडणुकीत तटकरे यांनी आम्हाला निवडून आणण्याची गॅरंटी द्या अशी खंत बोलून दाखवली आहे. 

रायगड लोकसभा मतदार संघात आतापर्यंत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर मतदान केले आहे. पहिल्यांदाच महायुती मध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली असल्याने घड्याळ चिन्हावर मतदान करावे लागणार आहे. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी घड्याळ चिन्हावर आपले मतदान करा असे आमदार भरत गोगावले यांनी आवाहन केले आहे. मोदी यांची विकासाबाबत गॅरंटी असून तटकरे याना निवडून आणण्याची आम्ही कबुली देत आहोत. मात्र लोकसभा निवडणुकीत तटकरे निवडून आल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम्हाला निवडून आणण्याची कबुली द्यावी अशी खंत आमदार गोगावले यांनी व्यक्त केली आहे. सुनील तटकरे यांनीही प्रतिक्रिया देताना गोगावले याना मदत करण्याची कबुली दिली आहे. 

Web Title: Admit to get us elected in assembly elections too! MLA Bharat Gogawle expressed his regret in a public meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.