रस्त्याने चाललेल्या तरुणाला तलवारीने हल्ला करून लुटले; थरमॅक्स चौकातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 23:29 IST2022-10-22T17:40:23+5:302022-10-22T23:29:38+5:30
पोलिसांकडून अनाेळखी चार जणांवर गुन्हा दाखल...

रस्त्याने चाललेल्या तरुणाला तलवारीने हल्ला करून लुटले; थरमॅक्स चौकातील घटना
पिंपरी : रस्त्याने चाललेल्या तरुणावर चार जणांनी तलवारीने हल्ला करत तरुणाजवळील मोबाइल, रोख रक्कम असा १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावला. हा प्रकार गुरुवारी (दि.२०) रात्री साडेअकराच्या सुमारास थरमॅक्स चौकात घडला. या प्रकरणी विजयकुमार मुन्नलाल बघेल (वय ३०, रा. भोसरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२१) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनाेळखी चार जणांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रस्त्याने पायी जात असताना रस्त्याच्या बाजूला मोटारसायकल थांबलेल्या आरोपींनी फिर्यादीची बॅग पकडून तेरे पास जो भी है जल्ही निकाल असे म्हटले. फिर्यादीने त्याला नकार दिला असता आरोपींनी फिर्यादीच्या हातावर तलवार मारून फिर्यादीच्या खिशातील पाकिटातील एक हजार रुपये, १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल, तसेच दोन हजार रुपये किमतीची बॅग हिसकावून पळ काढला.