विवाहित महिला डॉक्टरचे नग्न व्हिडीओ आणि फोटो केले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 16:18 IST2021-10-09T16:01:08+5:302021-10-09T16:18:34+5:30
पिंपरी : डाॅक्टर महिलेला लग्नाचे अमिष दाखवून व्हिडिओ कॉलवर बोलण्यास भाग पाडले. त्यांना कपडे काढण्यास सांगून नग्न व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्ड करून ते ...

विवाहित महिला डॉक्टरचे नग्न व्हिडीओ आणि फोटो केले व्हायरल
पिंपरी: डाॅक्टर महिलेला लग्नाचे अमिष दाखवून व्हिडिओ कॉलवर बोलण्यास भाग पाडले. त्यांना कपडे काढण्यास सांगून नग्न व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्ड करून ते व्हायरल केले. पिंपरी-चिंचवड शहरात २ मार्च २०२० ते ८ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला.
याप्रकरणी प्रणव अरविंद पांचाळ (रा. अटलादरा, जि. वडोदरा, गुजरात) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल ३६ वर्षीय पीडित महिलेने शुक्रवारी (दि. ८) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विवाहित असून, डाॅक्टर आहे. प्रणव पांचाळ याने फिर्यादी महिलेशी लग्न करण्याचा बहाणा केला. त्याच्या मोबाइलवरून फिर्यादीला व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलवरून बोलण्यास भाग पाडून त्यांना कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर नग्न व्हिडिओ स्क्रिन रेकॉर्ड केले व त्यांचे नग्न फोटो फिर्यादीच्या मेलआयडीवर व्हायरल केले.
तसेच फिर्यादीच्या पतीच्या मोबाइलवर हा व्हिडीओ पाठविला. तसेच त्याचा व्हिडिओ कॉल रिसिव्ह करण्यासाठी फिर्यादीशी मोबाइलवर वारंवार संपर्क केला. फिर्यादीच्या नातेवाइकांना फोटो व्हायरल करण्याच्या धमकी दिली. फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य व बदनामी करून फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, फिर्यादी डाॅक्टर महिलेचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले असून, २ मार्च २०२० ते ८ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.