महिलेची सहा वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या; गावात चिंतेचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 12:06 IST2022-06-23T12:02:06+5:302022-06-23T12:06:07+5:30

पाच जणांनी महिलेला शिवीगाळ करत काठीने मारहाण केली होती

Woman commits suicide by jumping into a well with her six year old son | महिलेची सहा वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या; गावात चिंतेचे वातावरण

महिलेची सहा वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या; गावात चिंतेचे वातावरण

कुरकुंभ : जिरेगाव (ता. दौंड) येथील महिला उज्वला संतोष सूर्यवंशी (वय ३०) हिने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह गट क्रमांक ४९६ स्मशानभूमी परिसरात असणाऱ्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (दि.२१) रोजी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे काही काळ गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत बापूराव शंकर सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धनाजी नारायण गाढवे, गणेश नारायण गाढवे, अभिषेक हरिदास गाढवे, हरिदास बाबुराव गाढवे, दत्तात्रय अशोक जांबले (सर्व रा. जिरेगाव ता.दौंड) यांच्या विरोधात पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादीची मुले संतोष व संदीप सूर्यवंशी तसेच संतोष याची पत्नी उज्वला सूर्यवंशी यांना वरील पाच जणांनी शिवीगाळ करीत काठीने मारहाण केल्याची घटना घडली. याचेच शल्य मनात ठेवून उज्वला हिने आपल्या मुलासोबत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.

Web Title: Woman commits suicide by jumping into a well with her six year old son