पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा येत्या रविवारी होणार? अजूनही चर्चा सुरु...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 20:15 IST2025-12-25T20:14:36+5:302025-12-25T20:15:03+5:30
पुण्यात आणि पिंपरी चिंचवडसाठी काँग्रेस, शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी अशी आम्ही एकत्रित चर्चा करत असल्याची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून देण्यात आली आहे

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा येत्या रविवारी होणार? अजूनही चर्चा सुरु...
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) या दोन्ही राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा लांबणीवर पडली आहे. आता या आघाडीची घोषणा येत्या रविवारी होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) या दोन्ही पक्षांच्या नेत्याची सातत्याने बैठका झाल्या आहेत. जागा वाटप अंतिम टप्पात आले आहेत. या सर्व पाश्वभुमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाच्या प्रमुख पदाधिका०यांशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) या दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा शुक्रवारी होणार होती. पण अदयापही या दोन्ही पक्षाकडुन अंतिम प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे या दोन्ही राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा लांबणीवर पडली आहे. आता या आघाडीची घोषणा येत्या रविवारी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) ४० जागा मागितल्या
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) ३० ते ४० पेक्षा जास्त जागा मागितल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये २५ ते ३० जागा मागितल्या आहेत. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडसाठी काँग्रेस, शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी अशी आम्ही एकत्रित चर्चा करत आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.
अशोक हरणावळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार ) मध्ये प्रवेश
पुणे महापालिकेतील उध्दवसेनेचे माजी गटनेते अशोक हरणावळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार)मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस ( अजित पवार) गटाचे शहराध्यक्ष सुनिल टिंगरे, सुभाष जगताप , कार्याध्यक्ष रूपाली ठाेंबरे, अभय मांढरे उपस्थित होते.