मानाच्या गणपती अगोदर आम्ही निघणार; पुण्यातील १०० मंडळे सकाळी ७ ला विसर्जन मिरवणूक सुरु करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 19:35 IST2025-08-02T19:33:28+5:302025-08-02T19:35:27+5:30
नवीन काहीतरी रूढी परंपरा आणण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार. आमचा पोलिसांशी संघर्ष झाला तरी चालेल

मानाच्या गणपती अगोदर आम्ही निघणार; पुण्यातील १०० मंडळे सकाळी ७ ला विसर्जन मिरवणूक सुरु करणार
पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीबाबत पुण्यात एक पत्रकार परिषद पार पडली आणि त्या पत्रकार परिषदेत मानाच्या पाच गणपतीनंतर अखिल मंडई मंडळ आणि त्यानंतर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ हे विसर्जन मिरवणूकीत सहभागी होतील असं सांगितलं गेलं. आणि त्यानंतर कुठंतरी पुण्यात जे अनेक वर्ष शंभर वर्षापेक्षा जास्त जुनी मंडळी आहेत. त्या मंडळामध्ये कुठंतरी नाराजी पसरली आहे. आमच्याकडे कुठंतरी दुर्लक्ष होतंय असा त्यांचा सूर आहे. त्यांनी मनाच्या गणपती अगोदर आम्ही निघणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आम्ही सकाळी ७ ला निघण्याची तयारी करणार आहे.
कार्यकर्ते म्हणाले, परवाची प्रेस बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की सामान्य मंडळाला कुठं न्याय मिळेल की नाही शंका आहे? आणि या मंडळाने जर अशा पद्धतीचा निर्णय घेतला तर बाकीच्या मंडळांनी करायचं काय? ह पण पहिल्या पाच मानाचे गणपती गेल्यानंतर ही रीतीरिवाजाप्रमाणे आम्ही सांगतोय. जर भाऊ रंगारी किंवा बाकीची मंडळी मध्ये गेले. तर रात्रीचे १२ वाजतील. आम्हाला बारा नंतर स्पीकर किंवा पथक म्हणा काहीच मिळणार नाही. शेवटी जागेवरती सगळं विसर्जन करावं लागेल. आमच्या मंडळांचे कार्यकर्ते काय करोडपती नाही ते लक्षपती नाहीत. पै ना पै गोळा करून कार्यकर्ते गणेश उत्सव साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पाच, सात मंडळ म्हणजे काय पुणे शहर नाही
सामान्य मंडळाच्या मागं उभे राहा. प्रशासन पाच ते सात मंडळ घेऊन जर चालत असेल तर पुणे शहर ते मान्य करणार नाही. कुठल्या गोष्टीचं आणि पाच, सात मंडळ म्हणजे काय पुणे शहर नाही म्हणता येणार. विसर्जन मिरवणुकीचा वेळ कमी करायचा असेल तर मानाच्या गणपतींच्या उपाययोजना केल्या पाहिजे. त्यांची मिरवणूक लवकर केली पाहिजे. त्यांच्यापुढं ते तीन, चार पथक लावलेले असतात. ते प्रत्येक मंडळाला एक खेळ लावण्याची तुम्ही संधी द्या. त्यामुळं प्रत्येक मंडळ लवकर पुढे सरकेल.
आम्ही मानाच्या गणपती नंतर जाणार
पूर्वीपासून जी प्रथा होती म्हणजे पाच - पाच मंडळं सोडली जायची ही प्रथा कधीपासून बंद पडली? ही प्रथा आजही सुरु आहे. ही प्रथा मोडण्याचा काहीजण प्रकार करत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. बर ही प्रथा प्रशासनानेच केलेली आहे. आणि हा संपूर्ण दबाव प्रशासनावर येणार आहे. मानाचे गणपती मिरवणूक सुरु करतात. प्रत्येक मंडळाच्या पुढे पाच पाच पथकं असतात. हे दहा ते पाच हे लक्ष्मी रोडचा ताबा सोडत नाही. पाच नंतर समजा दगडूशेठ येतात. त्याच्यानंतर वर्षानुवर्ष गेली अनेक वर्ष लक्ष्मी रोडचे पाच मंडळ जातात. शिवाजी रोडचे विद्युत रोषणाईचे पाच मंडळ जातात. असं गुणगोविंदाने सगळे मंडळांचं एकजुटीने सगळं व्यवस्थित होतं. पण कोणीतरी येतंय पत्रकार परिषद घेतंय आणि जाहीर करतंय की, आम्ही मानाच्या गणपती नंतर जाणार आहे.
आम्ही सकाळी ७ ला निघतो
नवीन काहीतरी रूढी परंपरा आणण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार. आमचा पोलिसांशी संघर्ष झाला तरी चालेल. पण आम्ही या रीती ही परंपरा मोडून देणार नाही. सकाळी सातला निघायचा आमचा निर्णय झालेला आहे. सकाळी सात वाजता म्हणजेच मानाच्या गणपतीच्या अगोदर निघायची आमची तयारी आहे. आम्ही शंभर एक मंडळ सकाळी सातला निघतो. वेळ बदलला तर मानाच्या गणपतीचा मान कमी होत नाही. तुम्ही समंजस भूमिका घ्या. आपण गुण्यागोविंदाने गणेश उत्सव चांगला साजरा करू.