माळेगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी वृषाली राहुल तावरे बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 20:08 IST2026-01-15T20:07:48+5:302026-01-15T20:08:01+5:30

या निवडीनंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली.

Vrushali Rahul Taware elected unopposed as Deputy Mayor of Malegaon Nagar Panchayat | माळेगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी वृषाली राहुल तावरे बिनविरोध

माळेगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी वृषाली राहुल तावरे बिनविरोध

माळेगाव : माळेगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी वृषाली राहुल तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार या निवडी पार पडल्या.

नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या मासिक सभेत उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याकडे वृषाली राहुल तावरे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. त्यांना सूचक म्हणून नगरसेविका दीपाली अनिकेत बोबडे व अनुमोदन वैभव धर्मेंद्र खंडाळे यांनी दिले. एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वच नगरसेवकांनी गटातटाचे राजकारण न करता अजित पवार हाच गट मानत बिनविरोध निवडीची परंपरा सुरू केली. यापूर्वी वृषाली राहुल तावरे या २०१५ ते २०२० या दरम्यान ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून काम पाहत होत्या. त्यांचे चुलत सासरे वसंत बाबुराव तावरे यांनी २००५ मध्ये ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून काम पाहिलेले आहे. तावरे यांना पक्षनिष्ठा व एकनिष्ठतेचे फळ मिळाल्याचे मानले जाते.

यावेळी गटनेते जयदीप तावरे यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून ॲड. राहुल तावरे व किरण खोमणे तसेच गट उपनेते म्हणून साधना वाघमोडे व पक्ष प्रतोदपदी धैर्यशील तावरे यांची निवड केली.

या तिघांचा सत्कार नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांनी केला. यावेळी सर्व नगरसेवक व नगरसेविका तसेच त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. या निवडीनंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली. यावेळी वसंतराव तावरे, किरण खोमणे, नगराध्यक्ष सुयोग सातपुते, प्रतोद धैर्यशील तावरे तसेच गटनेते जयदीप दिलीप तावरे यांनी मनोगत व्यक्त केले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली माळेगावचा सर्वांगीण व चौफेर विकास करण्याचा आमचा मानस आहे. त्यांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलून महिलांना जास्तीत जास्त सरकारी योजनांचा लाभ देण्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ - वृषाली तावरे, उपनगराध्यक्ष 

 

पत्नीचा झालेला पराभव स्वीकारला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलून संधीचे सोने केले जाईल. - ॲड. राहुल तावरे - स्वीकृत नगरसेवक

Web Title : वृषाली तावरे मालेगांव नगर पंचायत की निर्विरोध उप महापौर चुनी गईं

Web Summary : वृषाली राहुल तावरे मालेगांव नगर पंचायत की उप महापौर निर्विरोध चुनी गईं। अजित पवार के मार्गदर्शन में जयदीप तावरे को समूह नेता और राहुल तावरे को कॉर्पोरेटर चुना गया। घोषणा के बाद जश्न मनाया गया।

Web Title : Vrushali Taware Unanimously Elected Deputy Mayor of Malegaon Nagar Panchayat

Web Summary : Vrushali Rahul Taware elected unopposed as Deputy Mayor of Malegaon Nagar Panchayat. Under Ajit Pawar's guidance, other selections included Jaydeep Taware as group leader and Rahul Taware as corporator. Celebrations followed the announcement.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.