तब्बल ७५ लाखांच्या केमिकल पावडरची चोरी; दौंडच्या कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 18:44 IST2021-08-02T18:44:31+5:302021-08-02T18:44:37+5:30
यापूर्वी देखील कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कच्चा मालाच्या, टँकर मधील केमिकल, भंगार अशा अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत

तब्बल ७५ लाखांच्या केमिकल पावडरची चोरी; दौंडच्या कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील घटना
कुरकुंभ : दौंडच्या कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या मोडेप्रो या कंपनीत तब्बल ७५ लाख किंमतीच्या ब्रिंझ ७ नावाच्या ७५ किलो केमिकल पावडरची चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. यामध्ये सुनील ज्ञानदेव भंडलकर (रा. मळद ता.दौंड) या कामगारावर संशयित म्हणून आरोप करण्यात आला असून कुरकुंभ पोलीस पुढील तपास करत आहेत. २२ ते २९ जुलै दरम्यान हा प्रकार घडला आहे.
यापूर्वी देखील कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कच्चा मालाच्या, टँकर मधील केमिकल, भंगार अशा अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा प्रकारे केमिकल पावडर चोरल्याची गंभीर स्वरूपाची घटना घडली आहे.
दरम्यान केमिकल खरेदी विक्री च्या प्रकरणात एका कामगारासह अन्य या पावडरची उपयोगिता जाणणाऱ्या आणखी कुणाचा सहभाग होता. हे तपासणे गरजेचे ठरणार आहे. त्यामुळे अशा माध्यमातून अवैध केमिकल चा वापर करणाऱ्या कंपनी चालकांचा अथवा टोळीचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत मोडेप्रो कंपनीचे अधिकारी उमाजी रेडकर यांनी तक्रार दाखल केली असून पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे कुरकुंभ येथे विविध कंपनीत असणाऱ्या सुरक्षा यंत्रणेच्या पद्धती व कंपनीच्या अंतर्गत काम करणारे केमिकल ची माहिती असणारे जाणकार यांची देखील भूमिका तपासली जाणार का हा मुद्दा चर्चिला जात आहे.