पुण्यातील गुलटेकडी परिसरात तरुणावर तलवार, कोयत्याने वार; ६ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 02:54 PM2021-08-24T14:54:08+5:302021-08-24T14:54:34+5:30

तरुण रविवारी बापल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी चालले असताना घडला हा प्रकार

Sword, sickle attack on youth in Gultekdi area of Pune; Case filed against 6 persons | पुण्यातील गुलटेकडी परिसरात तरुणावर तलवार, कोयत्याने वार; ६ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील गुलटेकडी परिसरात तरुणावर तलवार, कोयत्याने वार; ६ जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देटोळक्याने हातात तलवारी, कोयते, पालघन व बांबू घेऊन परिसरात माजवली दहशत

पुणे : मोटारसायकल अंगावर घातली म्हणून जाब विचारल्याने गुंडाच्या टोळक्याने तरुणाच्या वाहनाची तोडफोड करुन तलवार, कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ६ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत राम राजू उमाप (वय २५, रा. अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर, सहकारनगर) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्रम शेख, अन्वर ऊर्फ जम्ब्या शेख, शाहरुख शेख, ओंकार पवार, अमित शेकापूर, इमात शेख (सर्व रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

राम उमाप हे रविवारी बापल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी चालले असताना अन्वर शेखने उमाप यांच्या अंगावर मोटारसायकल घातली. उमाप यांनी त्याचा जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली़. त्यानंतर सोमवारी पहाटे ३ वाजता राज यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालून त्यांच्या दुचाकीचा आरसा फोडून नुकसान केले. ते सोमवारी दुपारी २ वाजता वडिलांच्या घरी जात असताना गिरीधर भवन चौकात अक्रम शेख याने विनाकारण लाथ मारली.

त्याचा फिर्यादीने जाब विचारल्यावर सर्व जण टोळक्याने येऊन फिर्यादी यांच्या डोक्यात तलवारीने वार केला. शाहरुख शेख याने त्याच्याकडील तलवारीने फिर्यादीचे मित्र गोविंद याच्या पोटात घुसवून त्यांना जबर जखमी केले. अमित शेकापूर याने उमाप यांना बांबुने मारहाण केली. आजू बाजूच्या लोकांनी मदतीला येऊ नये, म्हणून या टोळक्याने हातात तलवारी, कोयते, पालघन व बांबू घेऊन परिसरात दहशत माजविली़. स्वारगेट पोलीस तपास करीत आहेत

Web Title: Sword, sickle attack on youth in Gultekdi area of Pune; Case filed against 6 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.