'राम कृष्ण हरी वाजली तुतारी', चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 03:02 PM2024-06-07T15:02:29+5:302024-06-07T15:03:24+5:30

बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचय, त्यांचा पराभव.., बस यही काफी है, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते

Supriya Sule reaction to Chandrakant Patil statement related baramati and sharad pawar | 'राम कृष्ण हरी वाजली तुतारी', चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

'राम कृष्ण हरी वाजली तुतारी', चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पुणे : महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारत यंदाच्या लोकसभेत समाधानकारक जागा मिळवल्या आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला १० पैकी ८ जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच जागा मिळालीये. शरद पवारांनी पक्षाचं नवीन चिन्ह, नवीन नाव या जोरावर ८ जागा मिळवून दाखवल्या. पण अजित पवारांना हे जमले नसल्याचे निकालावरून  दिसून आले. या निवडणुकीत देशभर चर्चा झालेल्या नणंद भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंनी बाजी मारलीये. लाखांच्या लीडने सुप्रिया जिंकून आल्याने महाराष्ट्रात त्यांचे कौतुक केले जात आहे. या विजयी जल्लोषात सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर पुण्यात प्रथमच  मार्केटयार्डात येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यभिषेक दिन निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथम मार्केटयार्ड छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

महायुतीने सुरुवातीच्या काळात चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी एका बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, शरद पवार यांना बारामतीमधून संपविणार. बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे. त्यांचा पराभव बस यही काफी है असा वक्तव्य त्यांनी केलं होत. या वक्तव्याचे त्यावेळी तीव्र पडसाद उमटले होते. अजित पवारांनी सुद्धा याबाबत नाराजी व्यक्त केली होती. याबाबत माध्यमांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी हात जोडून प्रतिक्रिया दिली आहे. राम कृष्ण हरी वाजली तुतारी अशा शब्दात त्यांनी पाटलांना उत्तर दिले आहे. 

अजित पवार काय म्हणाले होते 

शरद पवार साहेब हे बारामतीमध्ये निवडणुकीसाठी उभेच नव्हते तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही. साहेब निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती. बारामतीत उभे कोण होते, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे. पराभव होईल तो या दोघींपैकी एकीचा होईल ना? मग तरीही चंद्रकांत पाटील बारामतीत तसं का बोलून गेले माहिती नाही. नंतर आम्ही चंद्रकांतदादांना म्हणालो, तुम्ही पुण्यात काम बघा, बारामतीत काय असेल ते मी आणि आमचे कार्यकर्ते बघतील. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अवाक्षरही काढले नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. 

Web Title: Supriya Sule reaction to Chandrakant Patil statement related baramati and sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.