भोर तालुक्यातील धरणात लक्षणीय वाढ; भाटघर ६८ तर निरादेवघर ९२ टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 11:32 AM2021-07-28T11:32:12+5:302021-07-28T11:32:36+5:30

गतवर्षीच्या तुलनेत भाटघर धरणात २७ तर निरादेवघर धरणात ६६ टक्क्यांनी अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.

Significant increase in dam in Bhor taluka; Bhatghar 68 per cent and Niradevghar 92 per cent full | भोर तालुक्यातील धरणात लक्षणीय वाढ; भाटघर ६८ तर निरादेवघर ९२ टक्के भरले

भोर तालुक्यातील धरणात लक्षणीय वाढ; भाटघर ६८ तर निरादेवघर ९२ टक्के भरले

Next
ठळक मुद्दे भोर तालुक्यात पावसाची संततधार सुरुच असल्यामुळे धरण भागातील पाण्याची पातळी झपाटयाने होतीये वाढ

भोर : भोर तालुक्यात आठ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर ६८.७४ टक्के तर निरादेवघर धरण ९२.३० टक्के भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत भाटघर धरणात २७ तर निरादेवघर धरणात ६६ टक्क्यांनी अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. 

भोर तालुक्यात संततधार सुरु असून आज भाटघर धरण भागात १७ मिलीमीटर तर एकुण ४७० मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील हिर्डोशी खो-यातील निरादेवघर धरण भागात आज ४० मिली मीटर तर एकूण १५९९ मिली मीटर पाऊस झालेला आहे. चापेट गुंजवणी धरण भागात आज ४४ मिलीमीटर एकुण १२२६ मिलीमीटर पाऊस होऊन धरण ९२% भरले आहे. वीर धरणा भागात आज ० मिलीमीटर तर एकूण २४१ मिली मीटर पाऊस होऊन धरण ९७% भरले आहे.

भोर तालुक्यात पावसाची संततधार सुरुच असल्यामुळे धरण भागातील पाण्याची पातळी झपाटयाने वाढताना दिसत आहे. पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास निरादेवघर धरणा या महिन्यात तर भाटघर धरण भरायला आँगस्ट उजाडेल. भाटघर धरण २४ टीएमसी तर निरादेघर धरण १२ टिएमसी क्षमता आहे. तर गुंजवण धरण ४ टीएमसीचे असा एकूण ४० टिएमसी पाणीसाथ आहे. उन्हाळयात पुर्वेकडील लोकांना शेतीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी सोडले जाते. स्थानिकांना फारसा उपयोग होत नाही. दरवेळी उन्हाळयात भाटघर आणी निरादेवघर धरण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. 

Web Title: Significant increase in dam in Bhor taluka; Bhatghar 68 per cent and Niradevghar 92 per cent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app