'बारामती'त मतदारांची विक्रमी संख्या, ३ महिन्यात ५६ हजार नवे मतदार; मतदारांचा ओढा कुणीकडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:09 AM2024-04-24T11:09:25+5:302024-04-24T11:10:47+5:30

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २३ जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर केली होती....

Record number of voters in 'Baramati', 56 thousand new voters in 3 months; Voters turn to whom? | 'बारामती'त मतदारांची विक्रमी संख्या, ३ महिन्यात ५६ हजार नवे मतदार; मतदारांचा ओढा कुणीकडे?

'बारामती'त मतदारांची विक्रमी संख्या, ३ महिन्यात ५६ हजार नवे मतदार; मतदारांचा ओढा कुणीकडे?

पुणे : बारामतीलोकसभा मतदारसंघात तीन महिन्यांत ५६ हजार ७०० मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे ७ मे रोजी होत असलेल्या मतदानात २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. ही संख्या अंतिम झाली असून, ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २३ जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर केली होती. त्यानुसार बारामतीलोकसभा मतदारसंघात २३ जानेवारीला २३ लाख १५ हजार ९६८ इतके मतदार नोंदविले गेले होते. त्यानंतरही मतदार नोंदणीची मोहीम सुरू होती. आता बारामती मतदारसंघासाठी मतदार नोंदणीची मोहीम थांबवली असून मतदानासाठी २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार निश्चित केले आहेत. यावरून २३ जानेवारीपासून २३ एप्रिल या तीन महिन्यात ५६ हजार ७०० मतदारांची वाढ झाली आहे.

जिल्ह्यात २३ जानेवारीला ८१ लाख २७ हजार १९ मतदार संख्या निश्चित केली होती. त्यानंतर १६ मार्चपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये १२ एप्रिलपासून; तर पुणे, मावळ आणि शिरुरमध्ये १८ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. अर्ज भरण्याच्या दहा दिवस आधीपासून त्या त्या मतदारसंघातील नवमतदारांना अर्ज भरण्याची मुदत होती. त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंख्याची मतदार नोंदणीची मुदत दोन एप्रिलला संपुष्टात आली. त्यानंतर मतदारसंघातील मतदारसंख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवारी अंतिम मतदार निश्चित झाले.

जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात नवमतदार, स्थलांतरित झालेले आणि मृत अथवा दुबार नोंदणीमुळे त्यात वाढ झाली. तीन महिन्यात दोन लाख १० हजार ६५२ इतक्या मतदारांची वाढ झाल्याने २३ एप्रिलपर्यंत जिल्ह्याची मतदारसंख्या ८३ लाख ३७ हजार ६७१ इतकी झाली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन महिन्यांत १६ हजार ८२२ मतदार वाढले आहेत. त्यामुळे येथील मतदारसंख्या ५ लाख ३८ हजार ३१ इतकी झाली आहे.

खडकवासलापाठोपाठ भोरमध्ये १० हजार ७६, पुरंदरमध्ये १४ हजार ६६१, दौंडमध्ये ५ हजार ३४७, बारामतीत ५ हजार १७७ इतक्या मतदारसंख्येत वाढ झाली. सर्वाधिक कमी इंदापूर तालुक्यात ४ हजार ६१७ इतकी मतदारसंख्या वाढली आहे.

बारामतीतील मतदारस्थिती :

विधानसभा मतदारसंघ ....... २३ जानेवारीची मतदारसंख्या.....२३ एप्रिलची मतदारसंख्या

दौंड ..................२,९९,२६० ...........................३,०४,६०७

इंदापूर...............३,१८,९२४ ...........................३,२३,५४१

बारामती ...............३,६४,०४० ...................३,६९,२१७

पुरंदर ..............४,१४,६९० ........................४,२९, ३५१

भोर.............३,९७,८४५ ......................४,०७,९२१

खडकवासला.................५,२१,२०९ .............५,३८,०३१

एकूण ...................२३,१५,९६८ ..................२३,७२,६६८

Web Title: Record number of voters in 'Baramati', 56 thousand new voters in 3 months; Voters turn to whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.