रोज दोन तास प्रभागामध्ये फिरा; पालिका आयुक्तांचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 10:10 IST2026-03-03T10:10:30+5:302026-03-03T10:10:57+5:30

पुणे : पुणे महापालिकेचे परिमंडळ उपायुक्त, महापालिका सहायक आयुक्त, सर्व विभागांच्या अभियंत्यांना तक्रारीच्या ठिकाणी स्थळ पाहणी करणे बंधनकारक करण्यात ...

pune news walk around the ward for two hours every day; Municipal Commissioner's order | रोज दोन तास प्रभागामध्ये फिरा; पालिका आयुक्तांचा आदेश 

रोज दोन तास प्रभागामध्ये फिरा; पालिका आयुक्तांचा आदेश 

पुणे :पुणे महापालिकेचे परिमंडळ उपायुक्त, महापालिका सहायक आयुक्त, सर्व विभागांच्या अभियंत्यांना तक्रारीच्या ठिकाणी स्थळ पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काढले असून, दररोज सकाळी ९:४५ ते ११:४५ या कालावधीत ही पाहणी करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित झाली आहे.

महापालिकेकडून नागरिकांसाठी शहरात विविध विकासकामे, प्रकल्प, तसेच सोयीसुविधा दिल्या जातात. मात्र, संबधित ठिकाणी योग्य पद्धतीने काम होत नसल्यास नागरिकांकडून क्षेत्रीय सर्व विभागांच्या अभियंत्यांना तक्रारीच्या ठिकाणी स्थळ पाहणी करणे बंधनकारक केली.

आयुक्त कार्यालय, महापालिका कार्यालय, तसेच पालिकेच्या वेगवेगळ्या तक्रार निवारण प्रणालीवर तक्रारी केल्या जातात. या तक्रारी सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तक्रारीच्या ठिकाणी पाहणी करणे अपेक्षित असते. मात्र, त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने तक्रारी तशाच प्रलंबित राहतात. त्यामुळे आता परिमंडळ उपायुक्त व महापालिका सहायक आयुक्त, तसेच सर्व विभागांच्या अभियंत्यांना तक्रारीच्या ठिकाणी स्थळ पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

Web Title: pune news walk around the ward for two hours every day; Municipal Commissioner's order