HSRP : एचएसआरपी बसविण्यात पुणे मागे; वाहतूक संघटनांकडून मुदतवाढीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:52 IST2026-01-10T12:51:39+5:302026-01-10T12:52:04+5:30
राज्य परिवहन विभागाने २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा नंबर प्लेट’ (एचएसआरपी) बसविण्यास नवीन वर्षात मुदतवाढ दिलेली नाही.

HSRP : एचएसआरपी बसविण्यात पुणे मागे; वाहतूक संघटनांकडून मुदतवाढीची मागणी
पुणे : राज्य परिवहन विभागाने २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा नंबर प्लेट’ (एचएसआरपी) बसविण्यास नवीन वर्षात मुदतवाढ दिलेली नाही. पुण्यात अद्याप १५ लाख वाहनांना एचएसआरपी बसविणे बाकी आहे.
त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. पण, परिवहन विभागाने मुदतवाढ न देता निवडणुकांमुळे कारवाईचे आदेश दिलेले नाही. त्यामुळे आणखी काही महिने मुदतवाढ द्यावी, अशी विविध मागणी वाहतूक संघटनेकडून करण्यात येत आहे. राज्यात २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक आहे.
त्यानुसार पुण्यात २५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. मात्र, आत्तापर्यंत केवळ दहा लाख वाहनांच्या मालकांनी सुरक्षा नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी आठ लाखांच्या पुढे वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट बसविण्यात आली आहे. त्यामुळे राहिलेल्या वाहनांची संख्या पाहता मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे.