Pune Mayor : कोण होणार महापौर ? पुण्यात भाजपच्या 'या' महिला नगरसेविकांची नावे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:33 IST2026-01-22T13:27:03+5:302026-01-22T13:33:11+5:30

अखेर मुंबईतील मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत पार पडली.

Pune Municipal Election Results 2026 Who will be the mayor? General women reservation for the post of Pune mayor; Names of BJP's women corporators in discussion | Pune Mayor : कोण होणार महापौर ? पुण्यात भाजपच्या 'या' महिला नगरसेविकांची नावे चर्चेत

Pune Mayor : कोण होणार महापौर ? पुण्यात भाजपच्या 'या' महिला नगरसेविकांची नावे चर्चेत

पुणे -पुणे महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाचा टप्पा गाठला असून, महापौरपदासाठीचेआरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाल्याने महापालिकेच्या नेतृत्वात महिला महापौर विराजमान होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने ११९ जागांवर दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे महापौरपद भाजपकडेच जाणार, याबाबत फारशी शंका नव्हती. मात्र, आरक्षण जाहीर न झाल्याने महापौरपदासाठीच्या नावावर चर्चा रखडली होती. अखेर मुंबईतील मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत पार पडली. या सोडतीत पुणे महापालिकेसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर होताच भाजपमधील महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत.

यापूर्वी २०१२ आणि २०१७ मध्ये पुणे महापालिकेत महापौरपदासाठी सर्वसाधारण आरक्षण होते. मात्र, यंदा पहिल्यांदाच सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे शहराच्या कारभाराची सूत्रे कोणत्या महिला नगरसेविकेकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या भाजपमधून वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, स्वरदा बापट आणि रंजना टिळेकर ही नावे महापौरपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. पक्ष नेतृत्वाकडून लवकरच अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title : पुणे महापौर चुनाव: सामान्य महिला आरक्षण से भाजपा पार्षद चर्चा में

Web Summary : पुणे में महापौर चुनाव के लिए सामान्य महिला आरक्षण घोषित होने से महिला उम्मीदवार तय मानी जा रही हैं। बहुमत वाली भाजपा में वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, स्वरदा बापट और रंजना टिळेकर संभावित उम्मीदवार हैं। पार्टी नेतृत्व जल्द ही अंतिम निर्णय लेगा।

Web Title : Pune Mayor Race: General Women's Reservation Sparks BJP Councillor Discussions

Web Summary : Pune's mayoral election is set for a woman candidate as general women's reservation is announced. BJP, holding a majority, sees potential candidates like Varsha Tapkir, Manjusha Nagpure, Swarada Bapat, and Ranjana Tilekar in contention. The party leadership will soon announce the final decision.