निवडणुकीच्या कामासाठी गैरहजर; पुणे महापालिका सार्वजनिक विभागाच्या कनिष्ठ अभियंता निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 21:01 IST2025-12-26T21:00:21+5:302025-12-26T21:01:11+5:30
निवडणूक कामकाज हे राष्ट्रीय कर्तव्य असून राज्य निवडणूक आयोगाचे वेळोवेळी आदेश विचारात घेऊन विविध कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांच्या निवडणूक विषयक कामासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत

निवडणुकीच्या कामासाठी गैरहजर; पुणे महापालिका सार्वजनिक विभागाच्या कनिष्ठ अभियंता निलंबित
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या कामासाठी हजर न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अस्मिता गाडीवडर यांना निलंबित करण्यात आले आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुक कार्यालयाच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रशांत ठोबंरे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. पुणे महापालिकेेची निवडणुक जाहीर झाली आहे. त्यामुळे निवडणूक कामकाज हे राष्ट्रीय कर्तव्य असून राज्य निवडणूक आयोगाचे वेळोवेळी आदेश विचारात घेऊन विविध कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांच्या निवडणूक विषयक कामासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र काही कर्मचारी हे त्यांना नेमून दिलेल्या कार्यालयांकडे हजर न झाल्याने निवडणूक विषयक कामामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडे नियुक्ती केली असताना त्या कर्तव्यावर हजर राहिल्या नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अस्मिता गाडीवडर यांना निलंबित करण्यात आले आहेत.