भाजपच्या नगरसेवकांवर बजेटची खैरात; समाविष्ट गावातील नगरसेवकांना सात कोटींचे बजेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:11 IST2026-03-25T13:10:53+5:302026-03-25T13:11:54+5:30

भाजपच्या नगरसेवकांवर बजेटची खैरात करण्यात आली आहे. समाविष्ट गावातील भाजपच्या नगरसेवकांना सात कोटींचे बजेट देण्यात आले आहे.

Pune Municipal Corporation Budget handouts to BJP corporators; Budget of seven crores to corporators of included villages | भाजपच्या नगरसेवकांवर बजेटची खैरात; समाविष्ट गावातील नगरसेवकांना सात कोटींचे बजेट

भाजपच्या नगरसेवकांवर बजेटची खैरात; समाविष्ट गावातील नगरसेवकांना सात कोटींचे बजेट

पुणे : महापालिकेच्या २०२६-२७ च्या बजेटमध्ये सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना पाच कोटी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगरसेवकांना चार कोटी, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटींचे बजेट देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांवर बजेटची खैरात करण्यात आली आहे. समाविष्ट गावातील भाजपच्या नगरसेवकांना सात कोटींचे बजेट देण्यात आले आहे.

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी बजेट सादर केले. पालिकेत भाजपची एकहात्ती सत्ता असल्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले हे भाजपचे असल्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना आपापल्या प्रभागासाठी साधारणपणे पाच कोटींचे बजेट दिले आहे. समाविष्ट गावातील भाजपच्या नगरसेवकांना सात कोटींचे बजेट देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगरसेवकांना सुमारे ४ कोटींचे बजेट देण्यात आले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटींचे बजेट देण्यात आले आहे.

गटनेते, स्थायी समिती सदस्यांवर खैरात

महापौर, उपमहापौर यांच्यासह पालिकेतील सर्व पक्षांचे गटनेते, स्थायी समिती सदस्यांना प्रभागासाठी सर्वात जास्त बजेट देण्यात आले आहे. साधारणपणे प्रत्येकी सुमारे ८ ते १२ कोटींपर्यंत बजेट दिले आहे.

स्थायी समिती अध्यक्षांचा प्रकल्पावर भर

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी विविध विकास कामांचे प्रकल्प करण्यावर भर दिला आहे. भिमाले यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी ३५ ते ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

सहयादीचे बजेट १ हजार ३०० कोटींपेक्षा जास्त

पुणे महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना पाच कोटी, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार)पक्षाच्या नगरसेवकांना चार कोटी, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटींचे बजेट देण्यात आले आहे. सर्व पक्षांचे गटनेते आणि स्थायी समिती सदस्यांना प्रत्येकी दहा कोटी दिले आहेत. सहयादीचे बजेट १ हजार ३०० कोटींपेक्षा जास्त गेले आहे.

आयुक्तांच्या बजेटला १५ टक्के कात्री

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी तयार केलेल्या बजेटमधील विविध कामांना आणि तरतुदींना १५ टक्के कात्री लावण्यात आली आहे. त्यामधून उपलब्ध झालेला निधी नगरसेवकांच्या सहयादीसाठी वापरण्यात आला आहे.

 

Web Title : पुणे: भाजपा पार्षदों को बजट आवंटन में प्राथमिकता; अन्य को कम मिला

Web Summary : पुणे में भाजपा पार्षदों को अन्य दलों की तुलना में अधिक बजट मिला। शामिल गांवों के भाजपा पार्षदों को और भी अधिक मिला। समिति सदस्यों और नेताओं को सबसे अधिक मिला। इन आवंटनों के लिए नगर आयुक्त के बजट में कटौती की गई।

Web Title : Pune BJP Corporators Favored with Budget Allocations; Others Receive Less

Web Summary : Pune's BJP corporators received larger budget allocations than other parties. BJP corporators in included villages got even more. Committee members and leaders got the most. The municipal commissioner's budget was cut to fund these allocations.