Pune Mayor: पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे तर उपमहापौर पदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:13 IST2026-02-09T12:12:50+5:302026-02-09T12:13:41+5:30

Pune Mayor राष्ट्रवादीच्या शितल सावंत आणि कॉंग्रेसच्या अश्विनी लांडगे यांनी महापौर तर राष्ट्रवादीचे दत्तात्राय बहिरट आणि कॉंग्रेसचे साहिल केदारी यांची उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार

Pune Mayor Manjusha Nagpure elected as Pune Mayor and Parashuram Wadekar as Deputy Mayor unopposed | Pune Mayor: पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे तर उपमहापौर पदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड

Pune Mayor: पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे तर उपमहापौर पदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड

पुणे : पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडुन मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या शितल सावंत आणि कॉंग्रेसच्या अश्विनी लांडगे यांनी महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर राष्ट्रवादीचे दत्तात्राय बहिरट आणि  कॉंग्रेसचे साहिल केदारी यांनी उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.  पुणे महापालिकेत भाजपची एकहात्ती सत्ता असल्यामुळे या निवडणुकीत नागपुरे आणि वाडेकर यांचा विजय निश्चित झाले आहेत. 

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ११९ जागा मिळवून भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. भाजपच्या चौथ्यांदा निवडून आलेल्या वर्षा तापकीर यांच्यासह मंजुषा नागपुरे, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, स्वरादा बापट यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. महापौर कोण होणार याची उत्सुकता लागली होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदासाठी मुळचे आरपीआयचे असलेले आणि भाजपच्या चिन्हावर निवडुन आलेले परशुराम वाडेकर यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले. 

सिहंगड रोडला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार

निवडीच्या घोषणा झाल्यानंतर सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार आहे. नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. मंजूषा नागपुरे या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केलेले आहे. 

पत्नीपाठोपाठ पती उपमहापौर होणार

भाजपने उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांना संधी दिली आहे. गेल्या टर्ममध्ये परशुराम वाडेकर यांच्या पत्नी सुनिता वाडेकर या उपमहापौर होत्या. आता परशुराम वाडेकर हे उपमहापौर झाले आहेत. त्यामुळे पत्नी पाठोपाठ पती उपमहापौर झाले आहेत.

Web Title : मंजुषा नागपुरे पुणे की महापौर, परशुराम वाडेकर निर्विरोध उपमहापौर चुने गए

Web Summary : मंजुषा नागपुरे और परशुराम वाडेकर पुणे के महापौर और उपमहापौर निर्विरोध चुने गए। प्रतिद्वंद्वियों द्वारा नामांकन वापस लेने से भाजपा की आसान जीत सुनिश्चित हुई। नागपुरे, तीन बार की पार्षद, सिंहगढ़ रोड से पहली महापौर हैं। वाडेकर अपनी पत्नी, पूर्व उपमहापौर, के बाद इस पद पर आए, जिससे भाजपा का दबदबा बना रहा।

Web Title : Manjusha Nagpure elected Pune Mayor, Parshuram Wadekar Deputy Mayor unopposed

Web Summary : Manjusha Nagpure and Parshuram Wadekar were elected unopposed as Pune's Mayor and Deputy Mayor respectively. Rivals withdrew nominations, ensuring BJP's easy victory. Nagpure, a three-time corporator, marks the first mayor from Sinhagad Road. Wadekar follows his wife, a former Deputy Mayor, in the position, maintaining BJP's dominance.