Pune Airport: पुणे ते बंगळुरू नवीन विमान सेवा; सोमवार ते शुक्रवार दरम्यान मिळणार सेवा

By नितीश गोवंडे | Published: July 26, 2023 05:01 PM2023-07-26T17:01:11+5:302023-07-26T17:03:09+5:30

पुणे ते बंगळुरू व्हाया हैद्राबाद असा हा विमान मार्ग असणार आहे....

Pune Airport: New flight service from Pune to Bangalore; Service available from Monday to Friday | Pune Airport: पुणे ते बंगळुरू नवीन विमान सेवा; सोमवार ते शुक्रवार दरम्यान मिळणार सेवा

Pune Airport: पुणे ते बंगळुरू नवीन विमान सेवा; सोमवार ते शुक्रवार दरम्यान मिळणार सेवा

googlenewsNext

पुणे : पुण्याहून बंगळुरूसाठी आजपासून नवीन विमान सेवा सुरू करण्यात आली. स्टार एअरतर्फे ही सेवा सुरू करण्यात आली असून, सोमवार ते शुक्रवार दरम्यान ही सेवा पुणेकरांसाठी मिळणार आहे. पुणे ते बंगळुरू व्हाया हैद्राबाद असा हा विमान मार्ग असणार आहे.

पुण्याहून सोमवार ते शुक्रवार दरम्यान संध्याकाळी पावणे सात वाजता विमान उड्डाण घेणार असून, रात्री ८ वाजून १० मिनिटांनी ते विमान हैद्राबाद येथे लँड होईल, त्यानंतर रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी तेच विमान बंगळुरूकडे उड्डाण घेईन आणि रात्री ९:५५ वाजता बंगळुरू येथे पोहोचेल.

तसेच बंगळुरू येथून सोमवार ते शुक्रवार दरम्यान दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण घेईल आणि संध्याकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी हैद्राबाद येथे लँड होईल, तेथून संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी टेक ऑफ घेईल आणि संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी पुण्याला लँड होईल.

या मध्यमातून पुणेकरांना हैद्राबाद आणि बंगळुरू या दोन शहरांसाठी स्वस्त दरात विमान सेवा देण्याचा मानस असल्याचे मत स्टार एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Web Title: Pune Airport: New flight service from Pune to Bangalore; Service available from Monday to Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.