PMC Elections : महायुतीत आरपीआयची मते पुणे मनपात ठरणार निर्णायक; भाजप, शिंदेसेना अन् आरपीआयची ‘महायुती’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 13:00 IST2025-12-24T13:00:29+5:302025-12-24T13:00:58+5:30
महायुतीचा घटक पक्षात आरपीआय (आठवले) भाजप आणि शिंदेसेना यांच्यासोबत 'महायुती'मध्ये आहे.

PMC Elections : महायुतीत आरपीआयची मते पुणे मनपात ठरणार निर्णायक; भाजप, शिंदेसेना अन् आरपीआयची ‘महायुती’
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचा प्रभाव ठरणार असून पुणे शहरात आंबेडकरी चळवळीचे मोठे केंद्र असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आरपीआय) भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे. यामुळेच 'महायुती'मध्ये आरपीआयची ताकद प्रभावी ठरणार आहे.
महायुतीचा घटक पक्षात आरपीआय (आठवले) भाजप आणि शिंदेसेना यांच्यासोबत 'महायुती'मध्ये आहे. पुण्यात भाजपची ताकद मोठी असल्याने आरपीआयला त्यांच्यासोबत राहिल्याशिवाय पर्याय नाही. शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, माजी महापौर सुनीता वाडेकर, शैलेश चव्हाण, बाळासाहेब जानराव, माजी नगरसेवक अशोक कांबळे मैफाली वाघमारे, श्याम सदाफुले, युवक अध्यक्ष वीरेंद्र साठी आधी प्रमुख आरपीआय कार्यकर्ते म्हणून सध्या शहरात काम पाहत आहेत.
पुण्यातील काही विशिष्ट प्रभागांमध्ये आरपीआयची मोठी व्होट बँक आहे. महापालिका निवडणुकीत निकालावर परिणाम होऊ शकतो. यामध्ये मुंडवा, येरवडा आणि नगर रस्ता या भागात पक्षाची ताकद जास्त आहे. पूर्वीचा पुणे स्टेशन आणि ताडीवाला रोड : हा परिसर आरपीआयचा बालेकिल्ला मानला जातो. तसेच हडपसर आणि दांडेकर पूल परिसरात दलित वस्त्यांमध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्यांचे जाळे मोठे आहे. औंध, खडकी आणि बोपोडी या पट्ट्यातही आरपीआय निर्णायक भूमिका ठरत आहे.
- असा आहे संकल्प
पुणे मनपा निवडणुकीत आरपीआय (आठवले) स्वतंत्रपणे १२ ते १५ जागा जिंकण्याची क्षमता आहे. दोन दिवसांपूर्वीच आरपीआयच्या संकल्प मेळाव्यात केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी १२ जागांची मागणी केली आहे. महायुतीने आरपीआयला सन्मानजनक जागा दिल्या नाहीत, तर बंडखोरी किंवा अपक्ष उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवारांना फटका बसू शकतो.
मागील २०२७ चा प्रभाव
पुणे शहरात आंबेडकर चळवळीतील आरपीआय आठवले गट हा पहिल्यापासून प्रभावी ठरला आहे. शहरातील ५४३ झोपडपट्टीमधील दलित वस्तीमध्ये आरपीआयचा मोठा मतदार वर्ग आहे. २०२७ मनपा निवडणुकीत १५ जागांची मागणी केली. यामध्ये १० जागा देण्यात आल्या. त्यामध्ये ३ जागा फार्म भरताना अपात्र ठरल्यामुळे ७ जागांवर कमळ चिन्हावरती निवडणूक लढवली. यामध्ये ५ जागांवर विजय मिळवण्यात यश आले. यामध्ये डॉ. सिद्धार्थ झेंडे, फर्जना शेख, हिमानी कांबळे, सुनीता वाडेकर, सोनाली लांडगे यांनी विजय मिळवला होता.