PMC Election 2026 :पुण्यात पाणी, वाहतूक आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवू; इच्छाशक्ती असेल तर बदल शक्य - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:14 IST2026-01-10T12:13:44+5:302026-01-10T12:14:18+5:30

मी ज्या भागात राहते तिथेसुद्धा पाण्याची अडचण आहे. शहरात राहूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

PMC Elections Lets solve the problems of water, transport and cleanliness in Pune Change is possible if there is willpower Supriya Sule | PMC Election 2026 :पुण्यात पाणी, वाहतूक आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवू; इच्छाशक्ती असेल तर बदल शक्य - सुप्रिया सुळे

PMC Election 2026 :पुण्यात पाणी, वाहतूक आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवू; इच्छाशक्ती असेल तर बदल शक्य - सुप्रिया सुळे

पुणे - दादांनी सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली आहे. पुण्याच्या प्रश्नांची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि त्यावर उपाय काढण्याचा आमचा ठाम निर्धार आहे,” असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. पुण्यातील पाणी प्रश्नावर बोलताना त्यांनी टँकर माफियाचा उल्लेख करत सांगितले की, हा अनुभव त्यांनाही आहे. “मी ज्या भागात राहते तिथेसुद्धा पाण्याची अडचण आहे. शहरात राहूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
 
मेट्रोबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मेट्रोचा शेवटचा कनेक्टिव्हिटी टप्पा पूर्ण झाल्यावरच त्याचा खरा उपयोग कळतो. प्रत्येक मेट्रो स्थानक पूर्ण क्षमतेने सुरू झाले पाहिजे. वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत त्यांनी सांगितले की, पुढील दोन ते तीन वर्षांत वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाय करून दाखवू.

त्या पुढे म्हणाल्या, शहराचा वाढता खर्च कमी करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला जाईल. “सोलर प्रकल्पांमुळे विजेचा खर्च कमी करता येतो आणि पर्यावरणालाही फायदा होतो असे त्यांनी नमूद केले. पुणे स्वच्छ, सुंदर आणि गुन्हेगारीमुक्त व्हावे ही आमची भूमिका आहे. यातील अनेक कामे आम्ही यापूर्वी करून दाखवली आहेत, तर अनेक ठिकाणी कामे आधीच सुरू आहेत,” असे त्या म्हणाल्या. हे सगळे शक्य आहे, फक्त त्यासाठी इच्छाशक्ती लागते आणि ती आमच्यात आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेवटी पुणेकरांना आवाहन करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, घड्याळ-तुतारी बटण दाबा, आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो.

Web Title : सुप्रिया सुले ने पुणे की पानी, यातायात, स्वच्छता समस्याओं को हल करने का वादा किया।

Web Summary : राकांपा नेता सुप्रिया सुले ने आगामी पीएमसी चुनाव में पुणे की पानी की कमी, यातायात की भीड़ और स्वच्छता को संबोधित करने का संकल्प लिया। उन्होंने स्थायी समाधान, बेहतर मेट्रो कनेक्टिविटी और सतत विकास के लिए सौर ऊर्जा की आवश्यकता पर जोर दिया। सुले ने आश्वासन दिया कि दृढ़ इच्छाशक्ति से बदलाव संभव है।

Web Title : Supriya Sule vows to solve Pune's water, traffic, sanitation issues.

Web Summary : NCP leader Supriya Sule pledges to address Pune's water scarcity, traffic congestion, and cleanliness in the upcoming PMC election. She emphasized the need for permanent solutions, better metro connectivity and solar energy for sustainable development. Sule assured that with strong will, change is possible.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.