PMC Election 2026: नऊ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठाय ? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजप नेत्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:03 IST2026-01-08T15:02:07+5:302026-01-08T15:03:29+5:30
रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, ठिकठिकाणी कचरा दिसत आहेत, प्रदूषण वाढले आहे आणि पिण्याच्या पाण्याची मिळत नाही

PMC Election 2026: नऊ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठाय ? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजप नेत्यांना सवाल
पुणे -पुणे महापालिकेची सत्ता ज्यांच्या हातात होती, ते मागील नऊ वर्षांत ७५ हजार कोटी रुपयांचा खर्च केल्याचे सांगत आहेत . मात्र शहरात ठोस विकासकामे दिसत नाहीत. मग हा निधी गेला कुठे ? असा सवाल उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना केला आहे.
महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदरवारांच्या प्रचारार्थ भवानापेठ येथे आयोजित केलेल्या सभेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, जगातील ५०० शहरांचा अभ्यास करण्यात आला असता वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा जगात चौथा क्रमांक लागला आहे. पुण्याची सत्ता ज्यांच्या हातात दिली, त्यांच्या कामकाजाचे हे प्रतिबिंब असून ते अपयशी ठरले आहेत.
रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, ठिकठिकाणी कचरा दिसत आहेत, प्रदूषण वाढले आहे आणि पिण्याच्या पाण्याची मिळत नाही . “सफाईसाठी १२ हजार ३५० सफाई कर्मचारी असल्याचे सांगत त्यापैकी काही जणांना फोन करून चौकशी केली असता, आम्ही पुण्यातच नसल्याचे सांगितले, तर काहींनी सफाईचे काम करत करत नाही असे सांगितले. बोगस नावे दाखवून पुणे करांचे कोट्यवधी रुपये लुटण्यात आल्याचा आरोप करत या संदर्भातील सर्व कागदपत्रे आणि पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.
“मी पुराव्यांवरच बोलतो. शब्दाचा पक्का आहे. समाजाच्या भल्यासाठीच काम करतो. या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल, तर बदल केल्याशिवाय पर्याय नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र, राज्य आणि महापालिका निवडणुका वेगवेगळ्या असून ही निवडणूक पुणे महापालिकेची सत्ता कोणाच्या हातात द्यायची, याबाबतची आहे, असे सांगत त्यांनी पुणेकरांना आवाहन केले. “मी पुण्याचा आहे, तुम्हीही पुण्याचे आहात. चांगले-वाईट जे काही होणार आहे, ते आपल्या पुण्यातच होणार आहे. बाहेरचे लोक येऊन आश्वासने देतील; पण शेवटी आपले पुणे, आपला परिवार आहे, हे विसरता येणार नाही,” असेही ते म्हणाले.