PMC Elections : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी देणार भाजपला टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 23:45 IST2025-12-30T23:41:48+5:302025-12-30T23:45:02+5:30
भाजपने उमेदवारी नाकारलेल्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश

PMC Elections : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी देणार भाजपला टक्कर
पुणे :पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली आल्याने त्यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपला टक्कर देण्याचे काम ख०या अर्थाने दोन्ही राष्ट्रवादी कॉग्रेस करणार आहे. त्यात भाजपने उमेदवारी नाकारलेल्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केल्याने या पक्षाची ताकद वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार) तयार झाले आहेत. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार) बरोबर मैत्रीपुर्ण लढत होणार असल्याचे जाहीर केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील अनेकांचे भाजपमधील प्रवेश थांबले आहेत. उलट भाजपसह अन्य पक्षांनी तिकीट नाकारलेल्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची वाट धरली.
भाजपच्या माजी नगरसेवक अमोल बालवडकर, उध्दवसेनेचे गटाचे माजी गटनेते अशोक हरणावळ, नगरसेविका सुनीता गलांडे, भाजपचे माजी नगरसेवक शंकर पवार, धनंजय जाधव, संदीप जऱ्हाड तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ॲड. नीलेश निकम, स्वनील दुधाने, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट, मनसेचे जयराज लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांनी घड्याळाची वाट धरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची ताकद वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट १२५ जागा तर राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार) पक्ष ४५ जागावर निवडणुक लढवत आहे. भाजपची शिंदेसेनेबरोबर युती झालेली नाही. त्यामुळे भाजपला दोन्ही राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार चांगली लढत देउ शकणार आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणुक ख०या अर्थाने भाजप विरूध्द राष्ट्रवादी अशीच होण्याची शक्यता आहे.