PMC Elections 2026: विमाननगर-लोहगाव प्रभाग ३ मधील भाजप महिला उमेदवार आहेत ‘कोट्यधीश’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:52 IST2026-01-04T14:13:38+5:302026-01-04T14:52:11+5:30
- इतर उमेदवारांचा तुलनेत भाजपच्या ऐश्वर्या अतुल पाटील (बापूसाहेब पठारेंच्या सून) यांनी २७२ कोटींच्या एकूण मालमत्तेसह प्रभागात आघाडी घेतली आहे.

PMC Elections 2026: विमाननगर-लोहगाव प्रभाग ३ मधील भाजप महिला उमेदवार आहेत ‘कोट्यधीश’
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभाग क्र. ३ (विमाननगर-लोहगाव) मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला असून, या प्रभागातील बहुतांश उमेदवार ‘कोट्यधीश’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये इतर उमेदवारांचा तुलनेत भाजपच्या ऐश्वर्या अतुल पाटील (बापूसाहेब पठारेंच्या सून) यांनी २७२ कोटींच्या एकूण मालमत्तेसह प्रभागात आघाडी घेतली आहे.
सर्वात श्रीमंत उमेदवार ऐश्वर्या अतुल पाटील यांच्याकडे कुटुंबाची संयुक्त २१७ कोटींहून अधिकची स्थावर मालमत्ता असून एकूण २७२ कोटींच्या मालमत्तेसह त्या टॅापच्या श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख ५० हजार आहे तर त्यांचे पती सुरेंद्र पठारे यांचे उत्पन्न ३ कोटींच्या घरात आहे. वार्षिक उत्पन्नात श्रेयश प्रीतम खांदवे अव्वल असून त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा विचार करता ते ५ कोटी ६८ लाख रुपये इतके असून ते इतर उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
स्थावर मालमत्तेत उज्वला खांदवे यांचे (३५.११ कोटी) वर्चस्व तर श्रेयश खांदवे (२३.९० कोटी) यांनीही स्थावर मालमत्तेत मोठी गुंतवणूक केल्याचे दिसून येते.
विमाननगर-लोहगावमध्ये रंगणार प्रतिष्ठेची चुरस :
आर्थिक ताकद असली तरी या प्रभागात आमदार बापूसाहेब पठारे यांची सून म्हणून राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे. कोट्यधीश उमेदवारांच्या यादीत बंडू शहाजी खांदवे यांची मालमत्ता इतर उमेदवारांच्या तुलनेत कमी (६.३४ कोटी) असली तरी, स्थानिक जनसंपर्क आणि प्रचाराच्या जोरावर ते कशी टक्कर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे, अनिल सातव आणि रामदास दाभाडे यांच्यातही २१ कोटींच्या मालमत्तेसह कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. या ‘धनवान’ उमेदवारांपैकी लोहगाव-विमाननगरची जनता कोणाच्या पारड्यात आपले मत टाकते, हे आता निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. घोडा-मैदान जवळच आहे.
मालमत्तेचा तपशील: कोणाकडे किती संपत्ती?
प्रभागातील प्रमुख उमेदवारांनी जाहीर केलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची तुलना केली असता, संपत्तीचे आकडे थक्क करणारे आहेत.
| उमेदवार | वार्षिक उत्पन्न | स्थावर मालमत्ता | जंगम मालमत्ता | एकूण मालमत्ता |
| ऐश्वर्या अतुल पाटील | ३ कोटी | २१७.९३ कोटी | ५३.९२ कोटी | २७२ कोटी |