PMC Elections 2026 :'देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही, मी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार'; पुण्यात भाजपाच्या उमेदवाराची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:31 IST2025-12-30T13:30:00+5:302025-12-30T13:31:37+5:30
पुणे महानगर पालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली नसल्यामुळे अनेकांना नाराजी व्यक्त केली आहे. भाजपामध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.

PMC Elections 2026 :'देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही, मी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार'; पुण्यात भाजपाच्या उमेदवाराची नाराजी
PMC Elections 2026 : पुणे महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची मुदत आहे. उमेदवारीसाठी नेत्यांनी रांगा लावल्या आहेत, शहरात अनेकजण इच्छुक आहेत. यामुळे अनेकांची नाराजीही पाहायला मिळत आहे. पुण्यात भाजपामध्ये नेत्यांची नाराजी पाहायला मिळत आहे. पुणे भाजपाचे नेते अमोल बालवडकर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.
"विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याने माघार घेतली एक लाखाच्या मताधिक्याने चंद्रकांत पाटलांना निवडून आणलं त्यानंतर भाजपाने माझ्यासोबत दगा फटका केला. मला दोन दिवस अगोदर जरी सांगितलं असतं तरी मी ऐकलं असतं मात्र ऐनवेळी मला उमेदवारी नाकारली मी दादांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे अमोल बालवडकर म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता तो शब्द पाळला गेला नाही. यामध्ये भाजप पक्षाचे नुकसान आहे माझं नाही.
मी विधानसभेला चंद्रकांत पाटलांच्या विरोधात काम केलं होतं. याचं नुकसान माझ्यापेक्षा जास्त भाजपाला होणार आहे याचा फटका भाजपा बसेल, असंही ते म्हणाले.
तर दुसरीकडे पुण्यात भाजपा आणि शिवसेनेची अजूनही युती झालेली नाही. शिंदेसेनेने सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपकडून १५ अधिक १ म्हणजेच १६ जागांचा प्रस्ताव शिंदेसेनेपुढे ठेवला आहे. मात्र, शिंदेसेना २५ जागांवर ठाम आहे. भाजपकडून शिंदेसेनेला जागा वाटपाबाबत उत्तरे मिळाली नसल्यामुळे शिंदेसेनेची आज बैठक पार पडली. या बैठकीत दोघांची युती तुटल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात जागावाटपावरून गेले अनेक दिवस सुरू असलेला तिढा सुटण्याऐवजी आता थेट युतीच तुटल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात शिवसेना आता स्वबळावर निवडणूक लढवणार असून, तब्बल १६५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.