PMC Election Results 2026: आई वडिलांकडे शहर स्वच्छतेची जबाबदारी; सामान्य कुटुंबातून पुढे येत मुलाची नगरसेवक पदापर्यंत मजल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:03 IST2026-01-19T13:01:30+5:302026-01-19T13:03:58+5:30

PMC Election Results 2026 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असलेल्या अमर यांचे आई आणि वडील पुणे महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत.

PMC Election Results 2026 Parents are responsible for city cleanliness; A boy from a normal family rises to the position of a corporator | PMC Election Results 2026: आई वडिलांकडे शहर स्वच्छतेची जबाबदारी; सामान्य कुटुंबातून पुढे येत मुलाची नगरसेवक पदापर्यंत मजल

PMC Election Results 2026: आई वडिलांकडे शहर स्वच्छतेची जबाबदारी; सामान्य कुटुंबातून पुढे येत मुलाची नगरसेवक पदापर्यंत मजल

पुणे : पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगार विमल आवळे आणि विलास आवळे यांचा मुलगा अमर आवळे हे प्रभाग क्रमांक २७ मधून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे सफाई कामगारांचा मुलगा नगरसेवक झाला आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येत त्याने नगरसेवक पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या आई-वडिलांनी वर्षानुवर्षे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडली. आता त्यांच्या पाऊलावर पाऊल  ठेवत मुलगा प्रभागाचा विकास करण्यासाठी प्रयन्तशील असणार आहे.   

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आणि साने गुरुजी तरुण मंडळाचा कार्यकर्ता असलेले अमर आवळे यांची आई विमल आवळे आणि वडील विलास आवळे पालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. भाजपने प्रभाग क्रमांक २७ मधून अमर आवळे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत अमर आवळे मताधिक्याने विजयी झाले आहेत. या वसाहतीमधून महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जाणारा अमर हा पाचवा नगरसेवक आहे. यापूर्वी माजी नगरसेवक रमेश काळे, धनजंय जाधव, माजी नगरसेविका मनिषा घाटे, त्यानंतर भाजपचे शहरध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह आता अमर नगरसेवकपदी निवडून आले आहेत.

कसबा-विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तीन प्रभागात एकूण १२ जागांपैकी १० जागांवर भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले.  शनिवार पेठ व महात्मा फुले मंडई (प्रभाग २५), नवी पेठ-पर्वती (प्रभाग २७) आणि जनता वसाहत-हिंगणे खुर्द (प्रभाग २८) हे प्रभाग येतात. जनता वसाहत-हिंगणे खुर्द (प्रभाग २८) या प्रभागातून अमर आवळे विजयी झाले आहेत. 

प्रभाग क्रमांक २७ विजयी उमेदवार 

अमर आवळे (भाजप)
स्मिता वस्ते (भाजप)  
लता गौड  (भाजप) 
धीरज घाटे  (भाजप)

Web Title : पुणे पीएमसी चुनाव: सफाई कर्मचारी का बेटा 2026 में बना नगरसेवक।

Web Summary : सफाई कर्मचारियों के बेटे अमर आवले ने वार्ड 27 से भाजपा पार्षद के रूप में पीएमसी चुनाव जीता। अपने माता-पिता के नक्शेकदम पर चलते हुए, उनका लक्ष्य अपने वार्ड का विकास करना है। कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्र में भाजपा को बहुमत मिला।

Web Title : Pune PMC Election: Sanitation worker's son wins as corporator in 2026.

Web Summary : Amar Awale, son of sanitation workers, won PMC election from Ward 27 as a BJP corporator. Following his parents' footsteps, he aims to develop his ward. BJP secured a majority in Kasba-Vishrambagwada region.