PMC Election Results 2026: भाजपची आघाडी! पुण्यात पहिल्या फेरीनंतर ४७ तर पिंपरीत ३८ जागांवर आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:38 IST2026-01-16T11:36:14+5:302026-01-16T11:38:02+5:30
PMC Election Results 2026 भाजप , शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत येणार

PMC Election Results 2026: भाजपची आघाडी! पुण्यात पहिल्या फेरीनंतर ४७ तर पिंपरीत ३८ जागांवर आघाडी
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. अनेकजण राजकीय पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजप , शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत येणार आहे.
पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट
पुण्यात भाजप ४७ जागांवर आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी १२ जागांवर आघाडीवर आहे. पिंपरीत भाजप ३८ जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी ११ जागांवर आघाडीवर आहे. पुणे आणि पिंपरीत भाजप आणि राष्ट्रवादी सध्या पुढे आहेत. इतर पक्षांना २, ३ जागा आता तरी मिळाल्या आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी ६९२ उमेदवार लढत आहेत.