PMC Election Results 2026: पुण्यात भाजपची सत्ता! राष्ट्रवादीची आघाडी असूनही अपयश; विजयी उमेदवारांची यादी समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:29 IST2026-01-16T16:28:39+5:302026-01-16T16:29:53+5:30

PMC Election Results 2026 पुण्यात भाजपने चांगलीच मुसंडी मारली असून जवळपास ९० च्या आसपास जागांवर आघाडी घेतली असून राष्ट्रवादीचे १० उमेदवार आघाडीवर आहेत

PMC Election Results 2026 BJP in power in Pune! Despite the NCP's alliance, failure; List of winning candidates revealed... | PMC Election Results 2026: पुण्यात भाजपची सत्ता! राष्ट्रवादीची आघाडी असूनही अपयश; विजयी उमेदवारांची यादी समोर...

PMC Election Results 2026: पुण्यात भाजपची सत्ता! राष्ट्रवादीची आघाडी असूनही अपयश; विजयी उमेदवारांची यादी समोर...

पुणे :  पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर लढत असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली आहे. भाजप, शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने सभांचा धडाका लावला होता. दोन्हीकडे भाजपवर टीकाही केली होती. पुण्यात नागरिकांनी भाजपला सत्तेची संधी दिली आहे. त्यामुळे अजित पवारांचे सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगले असल्याचे दिसून आले आहे. 

पुण्यात भाजपने चांगलीच मुसंडी मारली असून जवळपास ९० च्या आसपास जागांवर आघाडी घेतली आहे. तर ६० पेक्षा जास्त नगरसेवक आतापर्यंत निवडून आले आहेत. मात्र या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असूनही जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी अपयशी ठरल्या आहेत. पिंपरीतही भाजपची सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे १० उमेदवार सध्या आघाडीवर असून ४ नगरसेवक निवडून आले आहेत. अनेकजण राजकीय पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजप , शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढत सर्वत्र  सुरु आहे.

राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांची यादी 

पुणे प्रभाग १

क - रेखा चंद्रकांत टिंगरे राष्ट्रवादी 
प्रभाग १८ 

ड गौरव घुले  राष्ट्रवादी 

प्रभाग ३३

अनिता इंगळे राष्ट्रवादी शरद पवार
 सोपान उर्फ काका चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार  

प्रभाग २३

सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर 


प्रभाग ११

हर्षवर्धन मानकर 
 

Web Title : पुणे महानगरपालिका चुनाव 2026 में भाजपा जीती; राष्ट्रवादी विफल।

Web Summary : भाजपा ने पुणे महानगरपालिका चुनाव जीता, 90 वार्डों में आगे। राकांपा गठबंधन के बावजूद बहुमत नहीं मिला। राकांपा के चार पार्षद जीते।

Web Title : BJP wins Pune Municipal Corporation election in 2026; NCP fails.

Web Summary : BJP secured Pune's PMC election, leading in 90 wards. Despite NCP's alliance, they couldn't gain majority. Four NCP corporators won.