PMC Election 2026: प्रामाणिक काम करूनही भाजपने उमेदवारी का नाकारली? पुण्यातील माजी नगरसेवक लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:24 IST2025-12-31T12:23:58+5:302025-12-31T12:24:44+5:30
PMC Election 2026 ज्या प्रभागात भाजपला कुणीही विचारत नव्हतं त्या प्रभागात आम्ही सुरुवातीपासून काम करतोय

PMC Election 2026: प्रामाणिक काम करूनही भाजपने उमेदवारी का नाकारली? पुण्यातील माजी नगरसेवक लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र
पुणे : माझं काय चुकलं? असं म्हणत भाजपचे माजी नगरसेवक किरण बारटक्के नरेंद्र मोदी यांना प्रभागातील व भाजपच्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी पत्र पाठवणार आहेत आणि न्याय मागणार आहेत.
पुण्यातील नगरसेवकांना उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक किरण बारटक्के आक्रमक झाले. पुणे शहरात घडलेल्या सर्व प्रकाराबाबत प्रभाग क्रमांक ३२ मधील सर्व नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून पुण्यातील नेत्यांच्या तक्रारी करणार आहेत. ज्या प्रभागात भाजपला कुणीही विचारत नव्हतं त्या प्रभागात आम्ही सुरुवातीपासून काम करतोय. अनेक ठिकाणी आम्ही उमेदवारी मिळावी यासाठी फिरलो पण आम्हाला कोणी विचारलं नाही. कार्यकर्त्यांवर ही अन्याय झाला आहे. कार्यकर्त्यांना सतरंजी उचलण्याची वेळ भाजपने आणली आहे. त्याला मतदार योग्य उत्तर देखील देतील असं त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या भावना अनावर झाल्या. किरण बारटक्के यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांचा फोटो असून कमळाचा चिन्ह ऐवजी घड्याळाचे चिन्ह पाहायला मिळत आहे. किरण बारटक्के राष्ट्रवादी काँग्रेस मधून लढणार आहेत.