PMC Election 2026: पुण्यात आघाडी; १० ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरुद्ध, नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:59 IST2026-01-05T16:57:44+5:302026-01-05T16:59:36+5:30
PMC Election 2026 दोन्ही राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी असल्यामुळे त्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. पण त्यांनी माघार घेतली नाही

PMC Election 2026: पुण्यात आघाडी; १० ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरुद्ध, नेमकं कारण काय?
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस( शरद पवार )आणि राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार) या दोघाची आघाडी झाली आहे. पण १० जागावरती दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या घडयाळ विरूध्द तुतारी असे लढत आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या ऐकीमध्ये बेकी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली. पण अनेक ठिकाणी एबी फार्म दोन्ही पक्षाकडुन गेल्यामुळे अनेक ठिकाणी गाेंधळ झाला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणी बंडखोरी रोखण्यात यश आले आहे. प्रभाग क्रमांक १६ हडपसर सातववाडी येथे भाग्यश्री जाधव आणि अविनाश काळे यांना तर प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ पर्वती मधुन दिलीप शंकर आंदेकर ,अक्षदा प्रेमराज गदादे, अनिकेत क्षीरसागर यांना राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरद पवार )पक्षाने उमेदवारी दिली होती. पण दोन्ही राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी असल्यामुळे या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. पण त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर पक्षशिस्त भंगाची कारवाई केली आहे असे राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरद पवार ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकादारे सांगितले आहे. तरीही १० जागावरती राष्ट्रवादी कॉग्रेस( शरद पवार ) पवार गटाचे उमेदवार राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार) गटाच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाची आघाडी होउनही त्यांच्यामध्ये मैत्रीपुर्ण लढत होत आहे.