PMC Election 2026: मला बाजीराव म्हटले हे चांगलेच झाले, तिजोरीत आणा आणणारच;अजित पवारांचा फडणवीसांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 20:40 IST2026-01-13T20:36:20+5:302026-01-13T20:40:43+5:30
घड्याळाच्या चिन्हापुढील बटण दाबून धाेक्याचा अलार्म बंद करावा

PMC Election 2026: मला बाजीराव म्हटले हे चांगलेच झाले, तिजोरीत आणा आणणारच;अजित पवारांचा फडणवीसांवर पलटवार
पुणे : मोफत मेट्रो, बस प्रवासाचा निर्णय अचानक घेतलेला नाही. तर सखोल विचार करून, तज्ज्ञांचा सल्ला, राजकीय धैर्य व जनतेबद्दलच्या काळजीतुन घेतलेला आहे. महापालिका फक्त उत्पन्न मिळविण्यासाठी नव्हे, तर ती नागरिकांना सेवा देण्यासाठी, लोकाभिमुख कारभार करण्यासाठी असते, असे सांगतानाच मला बाजीराव म्हटल्या बद्दल आंनद वाटला आणि खिशात नाही आणा असे बाेलून मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या तिजोरीत भाजपमुळे पैसा शिल्लक राहीला नसल्याचे मान्य केले. आमच्या मनगटात जोर आहे. तिजोरीत आणा आणु असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या टिकेला उत्तर दिले. घड्याळाच्या चिन्हापुढील बटण दाबून धाेक्याचा अलार्म बंद करावा असे आवाहनही त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुण्याची वाहतूकीची परिस्थिती पाहील्यानंतर मन हेलावून जाते. रोज तासनतास नागरिक वाहतुक कोंडीत अडकतात. सध्या रोज 30 हजार नागरिक मेट्रोचा वापर करतात. तर रस्त्यांवर गर्दी कायम आहे. मेट्रोचा वापर कमी होतो. म्हणून स्वतःला प्रश्न विचारा. तुम्हाला रस्त्यावरील गर्दी कमी व्हायला नको का ? तुम्हाला लवकर घरी पोहोचायचे नाही का ? चांगले रस्ते व ताणतणावमुक्त जीवन आपल्याला नको का ? यासाठी धाडसी व ठोस निर्णय घ्यावे लागतात. महापालिका निवडणुकीत आम्ही दिलेली आश्वासने हे उपकार नाहीत किंवा दानधर्म नाही. हि निवडणुकीपुरती दिलेली आश्वासने नाहीत. आमचा जाहीरनामा पैसा उधळण्यासाठी नाही, लोकांनी भरलेला कर त्यांना योग्य स्वरुपात परत मिळावा, हा त्यामागील उद्देश आहे.
पुणेकरांनी घड्याळाचा अलार्म ऐकुन घड्याळाच्या चिन्हा पुढील बटण दाबून धाेक्याचा अलार्म बंद करावा. आमच्या मनगटात जोर आहे. त्यामुळे आम्ही हे करू. बस आणि मेट्राेचा प्रवास हा निर्णय घिसाडघाईने घेतलेला नाही. या क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करूनच ही याेजना जाहीर केली आहे. जे लाेकांना हवे आहे. ते आम्ही देणार आहोत. याकरीता केवळ अंदाजपत्रकाच्या दाेन टक्के इतकीच रक्कम खर्ची पडणार आहे. काही लोकांना राजकीय नियंत्रण गमविण्याची भिती वाटते. पुणे आणि पिंपरी चिचंवड मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचा महापौर होईल असे अजित पवार यांनी सांगितले.
पुरंदर उपसा सिचंन योजनेत ११० कोटी कमी झाले
पुरंदर उपास सिचंन योजना ३३० कोटीवर नेण्यात आली होती. पण मी आल्यानंतर ही योजना २२० कोटी रूपयावर आली. त्याबाबत अधिका०यांना विचारले ते म्हणाले, १०० कोटी पार्टी फंड मागितला होता. अन्य अधिकारी यांना १० कोटी असे ११० कोटी वाटले होते. मी सांगतो हे सर्व सत्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.