PMC Election 2026: भाजपकडून लाडक्या बहिणींना झुकते माप; पुण्यात निवडणुकीसाठी १६५ पैकी ९० जागांवर महिलांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 10:40 IST2026-01-01T10:39:04+5:302026-01-01T10:40:16+5:30
PMC Election 2026 नियमानुसार ८२ पुरुषांना संधी मिळणे अपेक्षित असताना भाजपने ७५ पुरुषांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे

PMC Election 2026: भाजपकडून लाडक्या बहिणींना झुकते माप; पुण्यात निवडणुकीसाठी १६५ पैकी ९० जागांवर महिलांना संधी
पुणे : महापालिका निवडणुकीची उमेदवारी देताना भाजपने लाडक्या बहिणींना झुकते माप दिले आहे. पुणे महापालिकेच्या १६५ जागांपैकी तब्बल ९० जागांवर महिला उमेदवारांना संधी देण्यात आली असून ७ ठिकाणी सर्वसाधारण जागेवर आरक्षित व खुल्या गटातील महिलांना संधी दिली आहे.
पुणे महापालिकेसाठी ४० प्रभाग चार सदस्यीय आणि एक प्रभाग पाच सदस्यांचा आहे. या प्रभागातून एकूण १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने १६५ पैकी ८३ जागा विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत. तर ८२ जागा पुरुष उमेदवारांसाठी आहे. मात्र, भाजपने निवडणुकीसाठी उमेदवारी देताना लाडक्या बहिणींना झुकते माप दिले आहे. महापालिकेच्या १६५ जागांपैकी तब्बल ९० जागांवर महिला उमेदवारांना संधी देण्यात आली असून ७ ठिकाणी सर्वसाधारण जागेवर आरक्षित व खुल्या गटातील महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे नियमानुसार ८२ पुरुषांना संधी मिळणे अपेक्षित असताना भाजपने ७५ पुरुषांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दुसऱ्या कोणत्याही पक्षाने एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना उमेदवारी दिलेली नाही. भाजपने लाडक्या बहिणींना झुकते माप दिल्याने महापालिकेच्या सभागृहात भाजपच्या बाकांवर पुरुष नगरसेवकांपेक्षा महिला नगरसेवकांची संख्या जास्त दिसणार आहे.
सर्वसाधारण जागांवर भाजपने या महिलांना दिली संधी
- निवेदिता एकबोटे
- संगीता दांगट
- कविता वैरागे
- वीणा घोष
- पल्लवी जावळे
- रेश्मा भोसले
- रंजना टिळेकर