PCMC Mayor: पिंपरी-चिंचवड महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजपमध्ये नाराजी, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 15:36 IST2026-02-03T15:35:38+5:302026-02-03T15:36:07+5:30

PCMC Mayor उपमहापौरपदासाठी नाव जाहीर करूनही शीतल शिंदे यांनी नकार दिला तर भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे महापौरपदासाठी इच्छुक असल्याने ते नाराज झाले

PCMC Mayor Dissatisfaction within BJP over Pimpri-Chinchwad Mayor and Deputy Mayor posts, what exactly happened? | PCMC Mayor: पिंपरी-चिंचवड महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजपमध्ये नाराजी, नेमकं काय घडलं?

PCMC Mayor: पिंपरी-चिंचवड महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजपमध्ये नाराजी, नेमकं काय घडलं?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रवी लांडगे यांनी मंगळवारी (दि.२) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणताही अर्ज दाखल न झाल्याने, दोन वेळा बिनविरोध नगरसेवक ठरलेले रवी लांडगे महापौरपदीही बिनविरोध निवडून येण्याचे स्पष्ट झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पार पडणाऱ्या या महापौर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने संवेदनशीलतेच्या भूमिकेतून महापौरपदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाजपकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल करणारा उमेदवार बिनविरोध निवडून येणार हे निश्चित झाले आहे. त्यानुसार भाजपने रवी लांडगे यांचे नाव अधिकृतपणे पुढे केले आहे. दरम्यान, उपमहापौरपदासाठी मात्र निवडणूक होणार असून, या पदासाठी भाजपकडून शर्मिला बाबर आणि राष्ट्रवादीकडून वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे उपमहापौर कोण होणार, याकडे सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या महापौरपदाचे उमेदवार रवी लांडगे यांच्यासाठी सुचक म्हणून पक्षनेते प्रशांत शितोळे तर अनुमोदक म्हणून अभिषेक बारणे आहेत. तर उपमहापौरपदाच्या उमेदवार शर्मिला बाबर यांच्यासाठी सुचक म्हणून अनुराधा गोरखे तर अनुमोदक म्हणून नम्रता लोंढे आहेत. राष्ट्रवादीच्या उपमहापौरपदाच्या उमेदवार वैशाली काळभोर यांच्यासाठी सुचक म्हणून प्रमोद कुटे तर अनुमोदक म्हणून अरुणा लंगोटे या आहेत.

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, शीतल शिंदे नाराज...

महापौर आणि उपमहापौर उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्राद्वारे उपमहापौरपदासाठी नाव जाहीर करूनही विजय उर्फ शीतल गोरख शिंदे यांनी हे पद स्वीकारण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. ‘मला कोणतेही पद नको. मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करेन,’ अशी भूमिका घेत ते महापालिकेतून बाहेर पडले. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे महापौरपदासाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी न दिल्याने ते महापालिकेत अनुपस्थित राहिले होते. यामुळे भाजपच्या शहर संघटनेत अस्वस्थता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title : PCMC महापौर और उपमहापौर पदों पर भाजपा में कलह उजागर।

Web Summary : रवि लांडगे PCMC के महापौर निर्विरोध चुने गए। भाजपा की शर्मिला बाबर और राकांपा की वैशाली कालभोर उपमहापौर के लिए प्रतिस्पर्धा कर रही हैं। उम्मीदवार चयन पर असंतोष के कारण भाजपा में आंतरिक असहमति सामने आई।

Web Title : BJP infighting over PCMC Mayor, Deputy Mayor posts revealed.

Web Summary : Ravi Landge elected unopposed as PCMC Mayor. BJP's Sharmila Babar and NCP's Vaishali Kalbhor compete for Deputy Mayor. Internal BJP dissent surfaces as leaders express dissatisfaction over candidate selection.