व्यक्तिगत गाठीभेटींवर पार्थ पवार यांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:22 IST2019-04-21T00:21:45+5:302019-04-21T00:22:12+5:30

मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी पनवेलमधील मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे.

Partha Pawar's emphasis on personal meetings | व्यक्तिगत गाठीभेटींवर पार्थ पवार यांचा भर

व्यक्तिगत गाठीभेटींवर पार्थ पवार यांचा भर

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी पनवेलमधील मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. शनिवारी सकाळी खारघरमधील कोपरे गावापासून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर सेक्टर १०, सेक्टर ८, सेक्टर २, सेक्टर ७, सेक्टर ११ मधील सर्व सोसायटींमधील रहिवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मतदारांबरोबरच कार्यकर्त्यांशीही ते वैयक्तिकरीत्या भेट घेत आहेत. या वेळी त्यांच्यासोबत सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, नगरसेवक हरीश केणी, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Partha Pawar's emphasis on personal meetings