Ajit Pawar | माध्यमांचे कॅमेरे पाहताच अजित पवारांनी ठोकली धूम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 15:57 IST2023-02-16T15:55:07+5:302023-02-16T15:57:48+5:30
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार जोरात सुरू...

Ajit Pawar | माध्यमांचे कॅमेरे पाहताच अजित पवारांनी ठोकली धूम!
पुणे : पुण्यात सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून या दोन्ही जागांसाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचेअजित पवार राजकीय गणिते जुळवण्यासाठी गाठीभेटी घेत आहेत. अजित पवार एका कार्यक्रमातून बाहेर पडल्यावर माध्यमांचे कॅमेरे बघताच त्यांनी धूम ठोकली. पुण्यातील एका कार्यक्रमाला अजित पवार आले होते. मात्र कार्यक्रम झाल्यावर माध्यम प्रतिनिधी त्यांची वाट बघत होते. कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार यांनी लिफ्टमधून खाली येताच कॅमेरे आणि माध्यम प्रतिनिधी पाहताच त्यांनी क्षणात गाडीत बसून पळ काढला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथ विधीवरुन केलेल्या गौप्यस्फोटानंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. कोथरूड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी अजित पवार आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केले असता कॅमेरे पाहताच क्षणाचाही विलंब न लावता अजित पवारांनी त्यांच्या वाहनात बसून धूम ठोकली.